TMC Manifesto 2024 : तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा घोषित; CAA, NRC अन् ममतादीदींच्या 10 मोठ्या घोषणा

''सर्वांसाठी एक पक्क घर देण्यात येईल, ६० वर्षांपेक्षा अधिकच्या व्यक्तींसाठी एक हजार रुपये प्रतीमहिना पेन्शन दिली जाईल, २५ वर्षांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना महिन्याला शिष्यवृत्ती मिळेल, ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्यांना १० लाखांपर्यंत स्टूडंट क्रेडिट कार्ड दिलं जाईल...''
TMC Manifesto 2024
TMC Manifesto 2024esakal
Updated on

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ साठी तृणमूल काँग्रेसचा जाहीरनामा बुधवारी प्रसिद्ध झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील पक्षाने दहा महत्त्वाच्या घोषणा या माध्यमातून केल्या आहेत.

जाहीरनाम्यामध्ये तृणमूल काँग्रेसने एनआरसी रोखण्याचा आणि युसीसीला संपूर्ण देशामध्ये लागू होऊ न देण्याचा शब्द दिला आहे. यासोबतच टीएमसीने म्हटलंय की, जर हातात सत्ता आली तर प्रत्येक कुटुंबाला पाच किलो रेशनचं धान्य दिलं जाईल आणि बीपीएल कुटुंबांसाठी मोफत १० गॅस सिलिंडर दिले जातील.

TMC Manifesto 2024
IPO News: पैसे तयार ठेवा! 23 एप्रिलला खुला होणार जेएनके इंडियाचा आयपीओ; पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या तपशील

टीएमसीचा जाहीरनामा जाहीर करताना पक्षाचे नेते डेरेक ब्रायन म्हणाले की, केंद्रात टीएमसीचं सरकार स्थापन झालं तर रोजगार हमी योजनेंतर्गत ४०० रुपये रोजगार दिला जाईल. सर्वांसाठी एक पक्क घर देण्यात येईल, ६० वर्षांपेक्षा अधिकच्या व्यक्तींसाठी एक हजार रुपये प्रतीमहिना पेन्शन दिली जाईल, २५ वर्षांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना महिन्याला शिष्यवृत्ती मिळेल, ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्यांना १० लाखांपर्यंत स्टूडंट क्रेडिट कार्ड दिलं जाईल, बंगालमधील लक्ष्मी भांडारच्या धर्तीवर महिलांना महिन्याला ठाराविक पैसे मिळतील आणि सर्वांसाठी १० लाखांपर्यंत आरोग्य विमा मिळेल.

TMC Manifesto 2024
X Blocked In Pakistan: पाकिस्तानकडून एलन मस्कला धक्का, 'हे' कारण देत ब्लॉक केला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X

अशा घोषणा ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने केल्या आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं चित्र आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरुन भाजपने सध्या त्यांना चांगलंच घेरलेलं आहे. आता तृणमूल काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भाजपची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.