नवी दिल्ली- लोकसभा सभागृहात घुसखोरी करणाऱ्यांचा प्लॅन बी तयार होता अशी माहिती मिळत आहे. प्लॅन ए चुकला किंवा काही कारणांमुळे अपयशी ठरला तर प्लॅन बी देखील तयार होता अशी कबुली लोकसभेची सुरक्षा भेदणाऱ्या एका प्रमुख सूत्रधाराने पोलिसांच्या चौकशीमध्ये दिली आहे. (Lok Sabha intruders had a Plan B in case their original plan went awry and they failed to reach the Parliament)
प्रमुख सूत्रकार ललित झा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. यावेळी झा अनेक खुलासे करत आहे. झा याने सांगितलं की, काही अडथळ्यांमुळे निलम, अमोल जर संसदेत घुसण्यास अपयशी ठरले असते. तर प्लॅन बी तयार होता. अशावेळी महेश आणि कैलाश यांनी दुसऱ्या मार्गातून संसदेत प्रवेश केला असता आणि त्यांनी कलर बॉम्ब पेटवून पत्रकारांसमोर घोषणा दिल्या असत्या.
महेश आणि कैलाश हे विशाल शर्मा याच्या गुरुग्राम येथील घरी पोहोचण्यास अपयशी ठरले असते, तर अमोल आणि निलम यांना कोणत्याही परिस्थितीची मिशन पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती झा याने पोलिसांना दिली आहे.
बुधवारी देशाच्या संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. २००१ च्या संसदेवरील हल्याच्या स्मृतिदिनीच असा प्रकार घडून आला. सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी पब्लिक गॅलरीतून लोकसभा चॅम्बरमध्ये उड्या टाकल्या. यावेळी त्यांनी गॅस कॅन फोडली आणि घोषणाबाजी केली. काही खासदारांनी आरोपी तरुणांना ताब्यात घेत मारहाण केली.
याच दरम्यान, अमोल आणि निलम संसदेबाहेर आंदोलन करत होते. त्यांनी गॅस कॅन फोडल्या आणि घोषणाबाजी सुरु केली. त्यांचा प्लॅन ए यशस्वी ठरला. त्यांना प्लॅन बी अवलंबण्याची गरज पडली नाही. दरम्यान, या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी सभागृहात केलेल्या गोंधळामुळे एकूण १४ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.