लोकसभा निवडणूक १०२४ साठी देशात राजकीय हालचालींना वेग आला आहे. यादरम्यान देशभारात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सोबत असलेले राजकीय पक्ष यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.
आता तमिळनाडू मध्ये भारतीय जनता पक्षासोबत असेलेला ऑल इंजिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कझगम म्हणजेच AISDMK नाराज असल्याचे समोर आले आहे. दरम्यान केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचे हरियाणा आणि महाराष्ट्रातील सहकारी पक्ष देखील नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यादरम्यान विरोधी पक्ष एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसत आहेत.यामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
तामिळनाडू मध्ये काय चाललंय?
तामिळनाडू मध्ये भाजपचे प्रमुख अन्नामलाई यांनी राज्यातील यापूर्वीचे सरकारांना भ्रष्ट म्हटले आहे. त्यांनी १९९१ ते १९९६ यादरम्यानच्या काळातील सरकारांवर प्रश्न उपस्थित केले होते. विशेष म्हणजे या काळात दिवंगत नेत्या जयललिता यांचे सरकार होते. या प्रकरणावरून सध्या भाजप आणि AISDMK यांच्यात नाराजगी समोर आली आहे. माजी मंत्री डी जयकुमार यांनी याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच दिल्लीतील नेतृत्वावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्यांनी म्हटले की, २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत AISDMK-भाजप युतीला एकही जागा जिंकता येऊ नये आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनू नयेत अशी अन्नामलाई यांची इच्छा आहे का? त्यांच्या हलचाली याच दिशेने होत आहेत. त्यांनी अन्नामलाई यांचं वक्तव्य मान्य न होणारं असल्याचं देखील म्हटलं आहे.
हरियाणामध्ये जेजेपी नाराज?
भाजप हरियाणामध्ये जननायत जनता पक्षासोबत आहे आणि दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री आहेत. यादरम्यान भाजपचे प्रभारी बिप्लब कुमार देव यांच्या अपक्ष आमदारांसोबतच्या बैठकांमुळे राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. तसेच त्यांनी उचाना या जागेवर भाजप उमेदवाराच्या विजयाची घोषणा देखील केली आहे. मात्र या जागेवर चौटाला यांचा या सीटवर मोठा प्रभाव आहे आणि ते या जागेवर निवडणूक लढवू शकतात.
कुस्तीपटूंच्या आंदोलनाने देखील दोन्ही पक्षांमध्ये दुरावा वाढला आहे. चौटाला आणि मनोहर लाल खट्टर या दोघांकडून नाराजी नसल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात देखीव धूसफुस
मागील वर्षी जून-जुलै दरम्यान सत्तेत आलेल भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात देखील सध्या वाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. मंत्रीमंडळाचा विस्तार देखील अद्याप रखडलेला आहे. यादरम्यान भाजपकडून शिंदे गटातील मंत्र्यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिंदे गटातील मंत्र्याची काम करण्याची पध्दतीबद्दल देखील भाजपकडून नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. यादरम्यान दोन्ही पक्षात दुरावा वाढण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.