Congress MP Suspended: संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभेत विरोधकांचा गोंधळ; काँग्रेसच्या 5 खासदारांचं निलंबन!

संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
loksabha
loksabhagoogle
Updated on

नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याच्या प्रकरणावरुन लोकसभेत घातलेल्या गोंधळामुळं काँग्रेसच्या पाच खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करताना सभागृहात असभ्य वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं या अधिवेशनात आता पुढे ते सहभाग घेऊ शकणार नाहीत. (Lok Sabha suspending five Congress MPs after being named by Speaker for disrupting House proceedings)

कोण आहेत कारवाई केलेले खासदार

टीएन प्रथापन, हीबी एडेन, एस जोथीमनी, राम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस या पाच खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर लगेचच विरोधकांनी सभागृहात कालच्या संसदेच्या सुरक्षेत झालेल्या गंभीर चुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला टार्गेट करत गोंधळ घालायला सुरुवात केली. (Latest Marathi News)

loksabha
Maratha Reservation : 'येत्या 24 तारखेला आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर..'; NCP आमदाराचा सरकारला स्पष्ट इशारा

कालची घटना दुर्दैवी

लोकसभेचे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, "कालची घटना दुर्देवी होती. पण यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. या प्रकरणात राजकारण होता कामा नये. त्यानंतर राज्यसभेतही गोंधळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. (Marathi Tajya Batmya)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.