Lokayukta Raid : 11 सरकारी अधिकाऱ्यांवर लोकायुक्तांचे छापे; सोने, रोकडसह मालमत्ता जप्त

Lokayukta Officers : ११ सरकारी अधिकाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
Lokayukta Raid
Lokayukta Raidesakal
Updated on
Summary

लोकायुक्त पोलिस महासंचालक प्रशांतकुमार टागोर, महानिरीक्षक सुब्रमणेश्वर राव यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात ही कारवाई करण्यात आली.

बंगळूर : बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी बुधवारी (ता. ११) राज्यात ११ जिल्ह्यांतील ५६ ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी (Lokayukta Officers) छापे मारले. यात ११ सरकारी अधिकाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

बेळगावात पंचायत राज खात्याचे सहायक कार्यकारी अभियंता महादेव बन्नूर यांच्या घरावर पहाटे टाकलेल्या छाप्याची कागदपत्रे तपासली. बेळगाव (Belgaum) तालुक्यातील येळ्ळूर गावच्या हद्दीत असलेल्या घरात देखील तपासणी झाली. यापूर्वी देखील लोकायुक्तांनी या ठिकाणी छापा मारून कागदपत्रे जप्त केली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर कारवाई झाली आहे.

Lokayukta Raid
पंचहमी योजनांसाठी काँग्रेस सरकारने 'एससी-एसटी'चे तब्बल 14 हजार कोटी वापरले? राष्ट्रीय आयोगानं धाडली नोटीस

बेळगाव निर्मिती केंद्राचे योजनाधिकारी शेखर गौडा यांच्या धारवाड येथील घरावर तसेच धारवाडमधील केसीडी रोडवरील सप्तपुरा आणि राधाकृष्णनगर येथील पेईंग गेस्ट असलेल्या ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. हासन, बंगळूर, कोलार, म्हैसूर, दावणगिरी, बळ्ळारी, धारवाड, बेळगाव, गुलबर्गा या जिल्ह्यांतील सुमारे १०० अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकांने बुधवारी पहाटे एकाच वेळी ५६ ठिकाणी शोध घेतला.

Lokayukta Raid
Lokayukta Raidesakal

बृहन बंगळूर महापालिकेच्या केंगेरी विभागातील महसूल अधिकारी बसवराज मागी हे मूळचे गुलबर्गा येथील असून, लोकायुक्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंगळूर आणि गुलबर्गा येथील निवासस्थानांवर छापे मारले. तेथे सोने आणि रोख रक्कम सापडली. तसेच लाखो रुपये किमतीचे कॅप्सी कॉइन्स देखील सापडले. मंड्या शहरातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शिवराज यांच्या घरावर आणि त्यांच्या नातेवाइकांच्या घरांवर छापे टाकले. शिवराज यांच्या नागमंगल तालुक्यातील इज्वलघट्टा येथील फार्महाऊस, क्रशरच्‍या व्यवसायाच्या ठिकाणी देखील पोलिस अधीक्षक सुरेश बापू यांच्या नेतृत्वाखाली झडती घेण्यात आली.

कोलार येथे तहसीलदार, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सहायक कार्यकारी अभियंता यांच्या घरांवर छापे टाकून कागदपत्रे जप्त केली. म्हैसूर येथील पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश यांच्या जेसीनगर येथील निवासस्थानात आणि गोकुलम येथील कार्यालयावरही छापा टाकून जमीन, शेतजमिनीसह रोकड व सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

Lokayukta Raid
MUDA Scam : पोलिस ठाण्यात बनावट कागदपत्र तयार करून 'मुडा'ची फसवणूक; मुख्यमंत्र्यांसह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चित्रदुर्गातील निवृत्त अभियंता एम. रवींद्र यांचे घर, हीरियूर तालुक्यातील सद्‍गु‍रू फार्महाऊस आणि ऐमंगलजवळील बाटली तयार करण्याच्या कारखान्यावरही छापे टाकण्यात आले. रामनगर जिल्ह्यातील हारोहळ्ळीच्या तहसीलदार विजियण्णा यांच्याशी संबंधित सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. विजियण्णा हे यापूर्वी कोलारचे तहसीलदार होते. लोकायुक्त पोलिस महासंचालक प्रशांतकुमार टागोर, महानिरीक्षक सुब्रमणेश्वर राव यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात ही कारवाई करण्यात आली.

ग्रामपंचायत सचिवाचीही झाडाझडती

हासन लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बंगळूर उत्तरमधील दासनपूर ग्रामपंचायतीचे सचिव एन. एम. जगदीश यांच्या हासन येथील घरासह बंगळूर येथील निवासस्थानी देखील कागदपत्रांची आणि इतर मालमत्तांची तपासणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.