Amit Shah : काँग्रेससाठी झारखंड ‘एटीएम’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नक्षलवादापासून मुक्त केले त्याचप्रमाणे आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी विविध योजनादेखील राबविल्या, असे प्रतिपादनही अमित शहा यांनी केले.
amit shah and jp nadda
amit shah and jp naddasakal
Updated on

जामतारा - ‘काँग्रेस पक्ष झारखंड राज्याकडे ‘एटीएम’प्रमाणे पाहात असून ‘झारखंड मुक्ती मोर्चा’(झामुमो) आणि काँग्रेस सरकार हे भ्रष्टाचार करण्यात एकमेकाशी स्पर्धा करत आहेत,’ असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केला.

छत्तीसगडमधील दुमका लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार सीता सोरेन यांच्या प्रचारासाठी जामतारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना शहा म्हणाले, ‘काँग्रेससाठी झारखंड म्हणजे, मतपढी, संपत्ती, जमिनी आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा मिळविण्याचे ‘एटीएम’ आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांच्यासह सर्व नेत्यांचे काँग्रेसशी संगनमत आहे.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नक्षलवादापासून मुक्त केले त्याचप्रमाणे आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी विविध योजनादेखील राबविल्या, असे प्रतिपादनही अमित शहा यांनी केले. ‘काँग्रेस सरकारच्या काळात आदिवासींसाठी केवळ २५ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती, या उलट मोदी सरकारच्या काळात मागील दहा वर्षांत ही तरतूद एक लाख २५ हजार एवढी वाढविण्यात आली आहे,’ असे शहा यांनी सांगितले.

‘काँग्रेस आणि ‘झामुमो’ सरकारच्या कार्यकाळात झारखंडमध्ये सर्रासपणे गोवंशाची तस्करी होत आहे,’ असा आरोपही शहा यांनी यावेळी बोलताना केला.

‘इंडिया आघाडी सनातन विरोधी’

कुशीनगर - विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी ही सनातन धर्माच्या विरोधात आहे,’ असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शुक्रवारी केला. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील भाजपचे उमेदवार विजय दुबे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

‘मतदारांनी जर योग्य उमेदवाराला निवडून दिले तर विकासकामांना गती येईल आणि जर चुकीच्या उमेदवाराची निवड केली तर महिलांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण होईल, उद्योजक येथून निघून जातील’ असे नड्डा म्हणाले. कोरोना काळात टाळेबंदी सारखे निर्णय घेणे अमेरिका किंवा युरोप मधील देशांच्या प्रमुखांनाही अवघड गेले ते निर्णय पंतप्रधान मोदी यांनी तातडीने घेण्याचे धाडस दाखवले, असे प्रतिपादन नड्डा यांनी केले.

‘कोरोना असो किंवा युक्रेन युद्धामुळे उद्‍भवलेली परिस्थिती असो, या सर्वांतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाच्या मार्गावर नेत देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर नेली. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आले, तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर जाईल’ असे जे.पी. नड्डा म्हणाले.

‘इंडिया’ आघाडीचा उल्लेख ‘घमंडिया’ आघाडी असा करत नड्डा यांनी आघाडीवर जोरदार टीका केली. मुस्लिमांच्या लांगूलचालनासाठी अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय आणि अतिमागासांच्या हक्काचे आरक्षण हिरावून घेऊन ते मुस्लिमांना देण्याचा ‘इंडिया’ आघाडीचा कट असल्याचा आरोप नड्डा यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.