नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असल्याने आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. केरळमधील भाजप आणि कम्युनिस्ट पार्टीमधील वाद सर्वश्रूत आहे. केरळचे मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (माकप) वरिष्ठ नेते विजयन यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.(loksabha election 2024 kerala cm Pinarayi Vijayan criticize bjp and rss ahead poll)
पिनराई विजयन म्हणालेत की, 'भारत माता की जय' आणि 'जय हिंद' या दोन घोषणा दोन मुस्लीम व्यक्तींनी दिल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही घोषणांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याग करणार का? विजयन यांनी उत्तर केरळमधील मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या मलप्पुरम जिल्ह्यामध्ये हे वक्तव्य केलं आहे. ते पुढे म्हणाले की, मुस्लीम शासक, नेते आणि अधिकाऱ्यांनी देशाचा इतिहास आणि स्वातंत्र्यता आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अजीमुल्ला खान नावाच्या एका मुस्लीम व्यक्तीने 'भारत माता की जय'चा नारा दिला होता. याठिकाणी आलेल्या काही संघातील नेत्यांनी आपल्या समोर असलेल्या लोकांना 'भारत माता की जय' ची घोषणा देण्यास सांगितलं होतं. ही घोषणा पहिल्यांदा कोण दिली होती? मला माहिती नाही की संघातील लोकांना याची माहिती आहे का नाही, पण ही घोषणा पहिल्यांदा अजीमुल्ला खान यांनी दिली होती, असं विजयन म्हणाले.
मी सांगितल्याप्रमाणे ही घोषणा एका मुस्लीम व्यक्तीने दिली आहे. त्यामुळे संघ परिवार या घोषणेचा त्याग करणार का? असा सवाल विजयन यांनी केलाय. ते पुढे म्हणाले की, राजकारणातील एका जुने नेते आबिद हसन यांनी सर्वात आधी 'जय हिंद'चा नारा दिला होता. तसेच मुघल सम्राट शाहजहाँ यांचा मुलगा दारा शिकोह याने मूळ संस्कृतमधील ५० पेक्षा अधिक उपनिषदांचा फारशी भाषेमध्ये अनुवाद केला होता. त्यामुळे भारतीय धर्मग्रंथ जगभरात पोहोचण्यासाठी मदत झाली.
भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये पाठवू इच्छिणाऱ्या संघ परिवारातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना याची माहिती असणे आवश्यक आहे, असं देखील विजयन म्हणाले आहेत. विजयन यांच्या सरकारने केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) विरोध केला आहे. सध्या माकप आणि भाजपमध्ये टोकाचा विरोध आहे. निवडणुका जशाजशा जवळ येतील तसे यांच्यामधील संघर्ष तीव्र होणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.