Mayawati
Mayawatisakal

BSP Party : उत्तर प्रदेशामध्ये ‘बसप’चा सुपडा साफ; भोपळाही फोडता आला नाही

कोणत्याही आघाडीत सामील नसलेल्या तसेच काँग्रेस आणि भाजपपासून समान अंतर राखून असलेल्या बहुजन समाज पक्षाचा (बसप) उत्तर प्रदेशात सुपडा साफ झाला आहे.
Published on

लखनौ - कोणत्याही आघाडीत सामील नसलेल्या तसेच काँग्रेस आणि भाजपपासून समान अंतर राखून असलेल्या बहुजन समाज पक्षाचा (बसप) उत्तर प्रदेशात सुपडा साफ झाला आहे. मागील निवडणुकीत बसपने समाजवादी पक्षासोबत आघाडी केली होती. या वेळी पक्षाने एकट्याच्या बळावर निवडणूक लढवत ७९ उमेदवार उभे केले होते.

उमेदवारी देताना जातींची समीकरणे पाहण्यात आली होती. पक्षाने ३५ मुस्लिम तर १२ ब्राह्मण नेत्यांना उमेदवारी दिली होती. सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला वापरात किमान मागील वेळी मिळालेल्या जागा टिकवू, असा मायावतींना विश्वास होता.

मात्र या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. दलितांकडे झालेले दुर्लक्ष मायावतींच्या मुळावर आले आहे असे विश्‍लेषकांचे मत आहे. दलित आणि मुस्लिम मते सप आणि काँग्रेसकडे वळल्याचा जबर फटका मायावतींना बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.