मोठी बातमी! मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन सिद्धरामय्या राष्ट्रीय राजकारणात करणार एन्ट्री? म्हैसूरमधून लोकसभा लढवण्याची सूचना

मागासवर्गीयांचे नेते म्हणून सिद्धरामय्या यांना राज्यात भक्कम राजकीय पाठबळ आहे.
CM Siddaramaiah
CM Siddaramaiahesakal
Updated on
Summary

सिद्धरामय्या यांचा करिष्मा आणि काँग्रेस सरकारचे कार्यक्रम यामुळे मोदींच्या लोकप्रियतेला राज्यात रोखण्यास मदत होईल, असे गणित वरिष्ठ मांडत आहेत.

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा काँग्रेसच्या (Congress) वर्तुळात सुरु आहे. मात्र, त्यांनी ते नाकारले असले तरी लोकसभेच्या राज्यात जास्तीत-जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केलेलं काँग्रेस त्यांना रिंगणात उतरण्याची गळ घालत आहे.

CM Siddaramaiah
Maratha Reservation : अतिरेक झाला की उद्रेक होणारच, मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; उदयनराजेंचा सरकारला कडक इशारा

सिद्धरामय्या यांनी लोकसभा निवडणूक (LokSabha Election) लढवली आणि जिंकले तर ते राष्ट्रीय पातळीवर काँग्रेससाठी मोठा आधार बनतील. यासोबतच उत्तरेकडील राज्यांमध्ये राजकीय जनाधार असलेल्या जुन्या समाजवादी मित्रांना काँग्रेसकडे आकर्षित करणे सोयीचे ठरेल, असाही वरिष्ठांचा अंदाज आहे.

दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले सिद्धरामय्या यांनीही यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यांना दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायची आहेत. यासाठी त्यांनी म्हैसूरमधून लोकसभेची निवडणूक लढण्याचा अजून निर्णय घेतलेला नाही. मागासवर्गीयांचे नेते म्हणून सिद्धरामय्या यांना राज्यात भक्कम राजकीय पाठबळ आहे.

पाच हमी योजना राबविण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. सिद्धरामय्या यांचा करिष्मा आणि काँग्रेस सरकारचे कार्यक्रम यामुळे मोदींच्या लोकप्रियतेला राज्यात रोखण्यास मदत होईल, असे गणित वरिष्ठ मांडत आहेत. केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास त्यांना महत्त्वाचे खाते देण्याचे आश्वासनही दिल्याची चर्चा आहे.

CM Siddaramaiah
Karnataka Politics : 'लवकरच सरकार कोसळणार, 45 आमदार आमच्या संपर्कात'; भाजप नेत्याच्या वक्तव्याने काँग्रेसमध्ये खळबळ

राज्यात काँग्रेस सरकारने १०० दिवस पूर्ण केले असून निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या हमी योजनांच्या अंमलबजावणीतून ग्रामीण स्तरावरही त्याची लोकप्रियता वाढली आहे. मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांना आणखी पाच वर्षे पूर्ण करायची आहेत. मात्र ते अडीच वर्षे मुख्यमंत्री असतील, तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे उर्वरित काळासाठी मुख्यमंत्री असतील, असा करार झाल्याची चर्चा आहे.

CM Siddaramaiah
Ramdas Athawale : आंबेडकरांचे संविधान कोणालाही बदलू देणार नाही आणि कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर..; आठवलेंचा स्पष्ट इशारा

मात्र, काँग्रेसने तसे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही, लोकसभेवर निवडूण गेल्यास रिक्त होणाऱ्या जागेवर त्यांचा मुलगा यतिंद्र सिद्धरामय्या यांना मंत्रीपद देऊ, असे आश्वासन काँग्रेसने केल्याचे समजते. म्हैसूरमध्ये भाजपच्या विरोधात लढण्यासाठी सिद्धरामय्या हेच सर्वोत्तम उमेदवार असल्याचे काँग्रेस नेत्यांचे मत आहे. शिवकुमार हे कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी कायम आहेत आणि निवडणुकीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसला जास्त जागा मिळणे अवघड नाही, असा कयास बांधण्यात आला आहे.

CM Siddaramaiah
Konkan Politics : लोकसभेनंतर नीलेश राणे आता विधानसभा निवडणूक लढवणार? मंत्री चव्हाणांची राणेंबाबत मोठी घोषणा

वरिष्ठ नेते भाजप सोडण्याच्या तयारीत

काँग्रेसने आता एक पाऊल पुढे टाकत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पराभव आणि गटबाजीतून भाजप अद्याप बाहेर आलेला नाही. ही परिस्थिती कायम असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री व्ही. सोमन्ना, खासदार रेणुकाचार्य, कट्टा सुब्रह्मण्य नायडू आणि इतर अनेक महत्त्वाचे लोक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.