Raj Thackrey on Delhi Visit: महायुतीत लवकरच चौथा भिडू? राज ठाकरेंची दिल्लीवारीवर प्रतिक्रिया म्हणाले, 'मला या असं....'

Raj Thackrey on Delhi Visit: शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) समावेश होण्याची चिन्हे आहेत.
Raj Thackrey on Delhi Visit
Raj Thackrey on Delhi VisitEsakal
Updated on

Raj Thackrey on Delhi Visit: लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे, निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. अशातच आता महायुतीच्या जोडीला मनसे येण्याची शक्यता आहे.शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) समावेश होण्याची चिन्हे आहेत. महायुतीच्या अनेक नेत्यांनी येत्या ४८ तासांत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडेल, असे म्हटले होते.

सध्या दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर समितीची बैठक सुरू असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत प्रदेश पातळीवर अनेक बडे नेते राजधानीमध्ये पोचले आहेत. राज ठाकरेही काल सायंकाळी विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले. ते महायुतीमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे, यावर दिल्लीत प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, 'मला फक्त या असं सांगितलं आहे'.

Raj Thackrey on Delhi Visit
Union Minister Resigns: भाजपला मोठा धक्का! माझ्यासोबत अन्याय झाला म्हणत केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा

"मला काहीच माहिती नाही, मी फक्त भेटायला आलोय. मला या असं सांगितलं म्हणून मी दिल्लीला आलो", अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

तर त्यांच्या महायुतीत येण्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "राज ठाकरे महायुतीत आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांच्या येण्याने महायुतीची शक्ती वाढेल. त्यांच्या येण्याने लोकसभेनंतर विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये राज ठाकरेंचा फायदा होईल ", असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Raj Thackrey on Delhi Visit
Rohit Pawar on Raj Thackrey and BJP: शरद पवार गटाची राज ठाकरेंना ऑफर, म्हणाले, 'जरा विचार करा... भाजपला गरज आहे, म्हणून...'

दरम्यान, राज ठाकरे हे भाजप नेत्यांना भेटण्याची मागील चार दिवसांतील ही दुसरी वेळ आहे. ‘मनसे’ने दक्षिण मुंबई, रत्नागिरी आणि शिर्डी या तीन मतदारसंघांपैकी एक जागा लढविण्याचा प्रस्ताव भाजपने ठेवला आहे. मुंबईतील मराठी मतांच्या बेगमीसाठी ‘मनसे’ने दक्षिण मुंबईची जागा लढविणे महायुतीला उपयोगाचे ठरेल असे भाजपचे मत आहे. बाळा नांदगावकर येथून उभे राहिल्यास त्यांना मोठा प्रतिसाद मिळू शकतो, असे बोलले जाते.

राज यांच्या महायुतीमधील प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही आहेत. गेल्या काही निवडणुकांत राज यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती, यामुळेच त्यांच्याबाबत ठोस निर्णय घेताना भाजपला अडचणी येत होत्या. आता चारशेपारचे लक्ष्य गाठण्यासाठी उदार धोरण स्वीकारायचे अशी भूमिका भाजपने घेतल्याचे बोलले जाते.

Raj Thackrey on Delhi Visit
Madha Lok Sabha 2024: मोहितेंची नाराजी निंबाळकरांचं तिकीट जाणार? माढ्यात भाजपमधील राडा चव्हाट्यावर

फडणवीसांकडूनच प्रस्ताव

‘मनसे’ला महायुतीत सामावून घ्यावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वापुढे ठेवला आहे. नाशिक, पुणे व मुंबई या भागांमध्ये मनसेचा मोठा प्रभाव आहे. राज ठाकरे यांच्या वाट्याला लोकसभा निवडणुकीत फारशा जागा येणार नसल्यातरीसुद्धा विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना चांगल्या जागा मिळू शकतात असे बोलले जाते. याबाबत राज हे स्वतःच अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Raj Thackrey on Delhi Visit
Maharashtra Weather Update: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.