प्रेमात विवाहिता वेडी; लग्न रोखण्यासाठी केली प्रियकराच्या पुतण्याची हत्या

प्रियकर दिनेश १२ फेब्रुवारीला लग्न करणार आहे
Killing boyfriends nephew to prevent marriage
Killing boyfriends nephew to prevent marriageKilling boyfriends nephew to prevent marriage
Updated on

राजस्थान : प्रेम हे प्रत्येकाला हवे असते. प्रेमासाठी काहीही करण्याची प्रेमीयुगुलांची तयारी असते. यामुळे मर्यादाही ओलांडल्या जातात. आपल्याबद्दल कोण काय विचार करेल, याचा साधा विचारही केला जात नाही. यामुळेच कुणाचा खून करण्यासही प्रेमीयुगुल तयार असतात. असाच एक प्रकार जोधपूर जिल्ह्यात घडला. येथे प्रेमात आंधळ्या झालेल्या विवाहित महिलेने लग्न रोखण्यासाठी प्रियकराच्या पुतण्याची निर्दयीपणे हत्या केली. (Killing boyfriends nephew to prevent marriage)

प्राप्त माहितीनुसार, जोधपूर जिल्ह्यातील पिपड येथील साठेन गावात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहित महिला संतोषचे दिनेश नावाच्या तरुणावर प्रेम (Love) होते. प्रेमात आंधळ्या झालेल्या संतोषने प्रियकर दिनेशच्या १२ वर्षीय पुतण्याची धारदार शस्त्राने हत्या केली. संतोषला काही दिवसांपूर्वी समजले की, तिचा प्रियकर दिनेश १२ फेब्रुवारीला लग्न करणार आहे. त्यामुळे प्रियकराचे लग्न रोखण्यासाठी तिने त्याच्या पुतण्याला ठार (Murder) मारले.

Killing boyfriends nephew to prevent marriage
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, माझ्या मृत्यूनंतर औरंगाबादमध्ये दफन करा

सायंकाळी १२ वर्षीय पुतण्याला घरी बोलावून त्याची निर्घृण हत्या (Murder) केली. हत्या केल्यानंतर संतोषने त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकून घरातील पेटीत ठेवला. रात्री उशिरा मृतदेह गावाच्या मागे असलेल्या झुडपात फेकून दिला.

अशी केली हत्या

संतोषने प्रियकराच्या पुतण्याला आमिष दाखवून घरी आणले. त्यानंतर खोलीत नेऊन मुलाच्या तोंडावर कपडा बांधला. जेणेकरून त्याच्या रडण्याचा आवाज आला नाही पाहीजे. यानंतर धारदार शस्त्राने डोक्यावर वार केले. यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. मुलाचा रक्ताने माखलेला मृतदेह घरात ठेवलेल्या पेटीत ठेवून रात्री झुडपात फेकून दिला होता.

Killing boyfriends nephew to prevent marriage
भाजप आमदाराच्या सुनेचा गंभीर आरोप; म्हणाली, पतीचे अवैध संबंध

२४ तासांत आरोपीला अटक

संतोषने सायंकाळी निष्पाप मुलाची हत्या केली. त्यावेळी संतोषचा पती शेतात होता आणि दोन्ही मुले गावात खेळायला गेली होती. मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेह एका पेटीत टाकून लपवून ठेवला. त्यानंतर रात्री पती व मुले झोपल्यानंतर पेटीत ठेवलेला मृतदेह गावाजवळील मंदिरासमोरील झुडपात फेकून दिला. दरम्यान, २४ तासांत खुनाचा उलगडा करून पोलिसांनी आरोपी संतोषला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.