नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ५० वर्षीय व्यक्तीचा मोमोज (momos) खाल्ल्याने मृत्यू झाला होता. वैद्यकीय तपासणीत श्वसनमार्गामध्ये मोमोज अडकल्याचे आढळले. यानंतर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (एम्स) सल्ला (Advisory) जारी केला आहे. तुम्हालाही मोमोज खाण्याची आवड असेल तर एम्सच्या (AIIMS) सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. (Love to eat momos?)
मोमोज (momos) हे आशियातील सर्वांत प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक आहे. रस्त्याच्या कडेला ओव्हनमध्ये वाफवलेले मऊ मोमोजसोबत मसालेदार चटण्या दिल्या की चव वाढते. मोमोजच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टफिंग असते. हे प्रामुख्याने नेपाळ, तिबेट आणि भारतात प्रसिद्ध आहे. हे चीनी पाककृतीमधील बाओजी, जिओजी आणि मंटो, मंगोलियन पाककृतीमध्ये बुझ आणि जपानी पाककृतीतील ग्योझा सारखे आहे.
चवीनुसार मोमोमध्ये (momos) मोनो-सोडिअम ग्लुटामेट (MSG) टाकले जाते. सोडिअम ग्लूटामेट एक पांढरा क्रिस्टल पावडर आहे. ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. सोबतच मज्जातंतूचे विकार, घाम येणे, छातीत दुखणे, मळमळ आणि हृदय गती वाढणे यासारखे धोके वाढतात. मोमोमध्ये पत्ता कोबीचे स्टफिंग असते. जे योग्य प्रकारे शिजवले नाही तर त्यातील टेपवर्म बीजाणू मेंदूपर्यंत पोहोचू शकतात.
मुळात ते मैद्याने बनवलेले असते. यामध्ये स्वादिष्ट स्टफिंग असते. ते वाफवले जाते. आजकाल अनेक प्रकारचे मोमोजही बाजारात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या मसालेदार चटण्या आणि सॉससह ते खाल्ले जाते. याचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. शरीराला गंभीर हानी पोहोचू शकतात.
ॲडव्हायजरीमध्ये काय म्हटले?
यानंतर एम्सच्या तज्ज्ञांनी मोमोज खाणाऱ्यांना सावधानतेचा इशारा देत सल्लागार जारी केला आहे. मोमोज गुळगुळीत आणि निसरडे असतात. मोमोज नीट चघळले नाही आणि गिळले तर दम गुदमरू शकतो. त्यामुळे या गोष्टीची नेहमी विशेष काळजी घ्या, असे एम्सच्या (AIIMS) ॲडव्हायजरीमध्ये (Advisory) म्हटले आहे.
पीठ स्वादुपिंडाचे नुकसान करते
मोमोजच्या वरचा थर पिठापासून बनविला जातो. मैद्यात मिसळलेल्या ब्लीच रसायनांमुळे स्वादुपिंडाचे मोठे नुकसान होते. ज्यामुळे इन्सुलिन निर्मिती क्षमतेवर परिणाम होतो. तसेच मोमोजमध्ये वापरलेली भाजी आणि चिकन जास्त वेळ ठेवल्यास खराब होतात. अशा पदार्थांपासून बनवलेल्या मोमोजचे सेवन केल्यास आजारी पडणे साहजिक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.