मला समजून घे; आता माझं लग्न झालंय...

lover said married girlfriend marry me at shivpuri
lover said married girlfriend marry me at shivpuri
Updated on

शिवपूरी (मध्य प्रदेश): मला समजून घे, आता मांझ लग्न झाले असून मला मुलगा आहे. पण, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर त्याने दोघांवर चाकूने हल्ला केला. यामध्ये अकरा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला तर महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झलकुई गावामध्ये राहात असलेल्या चोवीस वर्षीय महिलेचा विवाह झाला होता. विवाहापूर्वी महिला व अशोक आदिवासी (वय 25) चे प्रेमसंबंध होते. दोन वर्षानंतर महिला अकरा महिन्यांच्या मुलासह माहेरी आली होती. शेतामध्ये मुलाला सोबत घेऊन काम करत होती. यावेळी अशोक आला आणि माझ्यासोबत विवाह कर म्हणून पाठीमागे लागला. तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आपल्याशी विवाह करत नाही म्हटल्यावर त्याने चाकूने दोघांवर हल्ला केला. याघटनेत मुलाचा मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली आहे. अशोकला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, अशोकने चिमुकल्यावर चाकू हल्ला केल्यानंतर महिला त्याला अडवत होती पण त्याने महिलेवरही चाकूने वार केले. शिवाय, त्याने स्वतःवरही वार करून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.