LPG CNG Prices : 1 सप्टेंबरपासून LPG CNG च्या दरात होणार बदल; वाचा किंमत वाढणार की कमी होणार?

१ सप्टेंबरपासून सर्वसामान्यांबरोबरच सगळ्यांचे लक्ष एलपीजी आणि सीएनजीच्या जाहिर दरांवर लागले असेल.
LPG CNG Prices from 1 September
LPG CNG Prices from 1 Septemberesakal
Updated on

जीवनोपयोगी वस्तूंच्या दरांमध्ये सातत्याने बदल होत असतात. इंधनाच्या बाबतीतही तेच घडतं. दर महिन्याच्या सुरूवातील इंधन कंपन्या उत्पादनांचे नवीन दर जाहीर करत असतात. ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेला तेल विपणन कंपन्यांनी व्यवसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत (१९ किलो) ३६ रुपयांनी कमी केली होती. याचा थेट फायदा घरघुती सिलेंडर वापरकर्त्यांना झाला होता. आता नव्या महिन्यात एलपीजी सीएनजीच्या दरात होणाऱ्या जाहिर बदलाकडे सर्वसामान्यांबरोबरच सगळ्यांचे लक्ष लागून आहे. (LPG CNG Prices from 1 September, will it be rise or less)

एलपीजीची किंमत कच्च्या तेलाच्या किंमतीसह इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. सीएनजीचीही तीच स्थिती आहे. सीएनजीच्या प्रचंड वाढीमुळे वाहनचालकांचे बजेट ढासळले. किमती इतक्या वाढल्या की, टॅक्सी सेवांना त्यांचे किमान भाडे वाढवावे लागले आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या रोज खर्चावरही झाला. दिल्लीत सध्या प्रति किलो सीएनजीची किंमत 75.61 रुपये (आयजीएल), रुपये 80 (एमजीएल) आणि 83.9 रुपये (अदानी गॅस) आहे.

येत्या महिन्यात किंमती वाढणाक की कमी होणार

कच्च्या तेलाच्या किमतीवर एलपीजी आणि सीएनजीच्या किमची अवलंबून असतात. दरम्यान ब्रेंट क्रूडच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली असून सध्या ते प्रति बॅरल 99.80 डॉलरवर पोहोचले आहे. यावरून तेल विपणन कंपन्यांकडून दर कमी होण्याची शक्यता दिसत नाहीये. गेल्या दोन महिन्यांपासून एलपीजीच्या दरात फार मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे यात वाढ होण्याची शक्यता आहे. सीएनजीबाबत सांगायचे झाल्यास गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीच्या किमतीत सतत वाढ झाली आहे. त्यामुळे याच्या दरात घट होण्याची शक्यता फार कमी असून सीएनजीचे दर याच पातळीवर राहाण्याची शक्यता आहे.

LPG CNG Prices from 1 September
CNG Price Hike: ऑटो कंपन्या हादरल्या, सीएनजी वाहनांची विक्री खालावली

कसे ठरवले जातात दर

एलपीजीची किंमत ठरवण्यासाठी मूल्यांकन केल्या जातं. एलपीजीची किंमत ठरवण्यासाठी आयात समता मूल्य सूत्र वापरल्या जाते. यामध्ये कच्च्या तेलाची किंमत, सागरी मालवाहतूक, विमा, कस्टम ड्युटी, बंदर खर्च, डॉलर ते रुपया विनिमय, मालवाहतूक, तेल कंपनी मार्जिन, बॉटलिंग खर्च, विपणन खर्च, डीलर कमिशन आणि जीएसटी यांचा समावेश असतो. तर सीएनजी कच्च्या तेलापासून नाही तर नैसर्गिक वायूपासून बनते. त्यामुळे याचा थेट परिणाम सीएनजीच्या दरांवर होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.