LPG गॅस महागला, उद्या पेट्रोल-डिझेलही महाग होईल; पण हे कोणाचे अच्छे दिन ?

आज १ मार्चपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
Narendra-Modi-Rahul-Gandhi
Narendra-Modi-Rahul-Gandhi
Updated on

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढत आहे. त्यामुळे आज १ मार्चपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. या दरवाढीवर काँग्रेस पक्षाचे (Congress Party) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीका केली आहे. (LPG Gas Price Hikes, Tomorrow Petrol Diesel, Rahul Gandhi Attack On Modi Government)

Narendra-Modi-Rahul-Gandhi
देशाला ठोस योजनांची गरज पण पंतप्रधान फक्त गाजर दाखवतात - राहुल गांधी

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, एलपीजीच्या दरात (LPG Price Hike) वाढ करुन पुन्हा एकदा मोदी सरकारने स्पष्ट केले की सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणींशी त्यांना काही देणे-घेणे नाही. आज एलपीजी, उद्या पेट्रोल डिझेलची दरवाढ होईल. यामुळे कोणाचे अच्छे दिन आले आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()