New Army Chief: जनरल उपेंद्र द्विवेदी होणार नवे लष्कर प्रमुख; मनोज पांडे यांच्याकडून घेणार पदभार

Lt Gen Upendra Dwivedi : जनरल मनोज सी पांडे यांचा ३० जून रोजी कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर लष्कराचे उपप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची या पदावर नियुक्ती करण्यात येईल.
Lt Gen Upendra Dwivedi
Lt Gen Upendra Dwivedi
Updated on

नवी दिल्ली- जनरल उपेंद्र द्विवेदी यांची सरकारकडून नवे लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. जनरल मनोज सी पांडे यांचा ३० जून रोजी कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर लष्कराचे उपप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची या पदावर नियुक्ती करण्यात येईल. ३० जून रोजी ते या पदाचा पदभार स्वीकारतील. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

उपेंद्र द्विवेदी हे २०२२ ते २०२४ मध्ये उधमपुरमधील नॉर्थ कमानचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसीसी-इ-सी) होते. मध्य प्रदेशच्या रीवा सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी असलेले लेफ्टिनेंट जनरल द्विवेदी यांना १९८४ मध्ये जम्मू आणि काश्मीर रायफल्सचे कमीशन देण्यात आले होते. त्यांनतर त्यांनी या यूनिटचे नेतृत्व केले. द्विवेदी यांना प्रदीर्घ अनुभव आहे.

Lt Gen Upendra Dwivedi
Jammu and Kashmir: एका दहशतवाद्याचा खात्मा, 2 नागरिक जखमी; जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसात तिसरा हल्ला

नॉर्थ सैन्याचे कमांडर असताना जनरल द्विवेदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी अभियान सुरू केले होते. उत्तर आणि पश्चिमी सीमांवर विविध ऑपरेशन रावबणे आणि हे ऑपरेशन सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले आहे.

चीन लष्कराने गलवानमध्ये केलेल्या घुसखोरीनंतर सुरु झालेल्या चर्चांमध्ये जनरल द्विवेदी यांचा सक्रिय सहभाग होता. द्विवेदी यांचा यू. एस आर्मी वॉर कॉलेज, कार्लिंस्ले, यू.एस. ए.मध्ये नॅशनल डिफेंन्स कॉलेजमधील 'विशिष्ट फेलो' म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्याकडे सुरक्षा संदर्भातील अभ्यासक्रमातील एम. फिल आहे. याशिवाय सामरिक अभ्यास आणि सैन्य विज्ञानमधील दोन मास्टर डिग्री त्यांच्याकडे आहेत.

Lt Gen Upendra Dwivedi
Jammu Kashmir Encounter: गावात घुसले..पाणी मागितलं मग दिसतील त्यांच्यावर गोळीबार...कठुआमध्ये दहशतवाद्यांचा कहर

दरम्यान, लेफ्टिनेंट जनरल मनोज पांडे हे ३० एप्रिल २०२२ रोजी लष्कर सैन्य प्रमुख झाले होते. ते ३१ मे रोजी निवृत्त होणार होते, पण २६ मे २०२४ रोजी कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने त्यांच्या कार्यकाळ १ महिन्यांनी वाढवला होता. त्यामुळे त्यांना ३० जून २०२४ पर्यंत वाढीव कार्यकाळ मिळाला होता. त्यामुळे महिन्याच्या शेवटी त्यांना कार्यमुक्त व्हावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.