Crime News : AC च्या थंड हवेत चोराला लागली झोप, पोलिसांनीच केलं जागं अन्...

एसी सुरु केल्यानंतर थंड हवा लागल्याने चोराला झोप लागली, तो तिथेच जमिनीवर झोपी गेला. काही वेळातच त्याला गोढ झोप लागली. दरम्यान, शेजाऱ्यांनी उघडं गेट बघून डॉक्टर सुनील यांना फोन लावला. त्यानंतर डॉक्टर सुनील यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे एका घरामध्ये एक चोर चोरी करण्याच्या उद्देशाने घुसला खरा परंतु तो बाहेर येऊ शकला नाही. त्याचं कारण आहे एसीची थंड हवा. थंड हवेमुळे तो चोरी करणं विसरला आणि थेट झोपीच गेला.

जेव्हा चोराचे डोळे उघडले तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर पोलिस होते. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हे प्रकरण इंदिरानगर ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर २० इथलं आहे.

इंदिरा नगर येथे डॉक्टर सुनील पांडे हे राहतात. चोर घरात घुसला त्यावेळी पांडे हे वाराणसी येथे कर्तव्यावर होते. त्याचवेळी चोरी करण्यासाठी चोर घराचं गेट उघडून घरात घुसला. घरामध्ये तो ड्रॉईंग रुममध्ये गेल्यनंतर त्याने घरातला एसी सुरु केला.

Crime News
Lok Sabha Result: अजित पवारांचे भवितव्य लोकसभा निकालावर अवलंबून, काका बिघडवणार पुतण्याचं विधानसभेचं गणित?

एसी सुरु केल्यानंतर थंड हवा लागल्याने चोराला झोप लागली, तो तिथेच जमिनीवर झोपी गेला. काही वेळातच त्याला गोढ झोप लागली. दरम्यान, शेजाऱ्यांनी उघडं गेट बघून डॉक्टर सुनील यांना फोन लावला. त्यानंतर डॉक्टर सुनील यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

Crime News
Pat Cummins : IPL 2025 पूर्वी पॅट कमिन्सने उचलले मोठे पाऊल! आता 'या' नव्या संघाचा होणार कर्णधार

घटनास्थळी पोलिस पोहोचले तेव्हा चोर आतमध्ये निवांत झोपला होता. पोलिसांनी चोराला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे. डीसीपी नॉर्थ विजय शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरी करण्याच्या उद्देशाने चोर घरात घुसला होता. त्याने नशा केली होती, त्यामुळे एसीच्या हवेत झोपी गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.