लखनौच्या महिलेचे भारत-चीन सीमेवर ठाण

देवी पार्वती असल्याचा दावा; भगवान शंकराशी विवाह करण्याची इच्छा
Mahadev
Mahadev Google
Updated on

पिठोरागड - भारत-चीन सीमेवरील प्रतिबंधित क्षेत्रात एका महिलेने दहा दिवसांपासून ठाण मांडले आहे. या महिलेने पार्वती असल्याचा दावा करत महादेवाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली, आहे. त्यामुळे तिने प्रतिबंधित क्षेत्रातून हटण्यास नकार दिला असून तसा प्रयत्न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे.

भारत आणि चीन सीमेवरील प्रतिबंधित भागात सध्या एका महिलेने ठिय्या मांडला आहे. तिला तेथून हटविण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली असून ती स्वत:ला देवी पार्वतीचा अवतार असल्याचे सांगत आहे. हरमिंदर कौर असे त्या महिलेचे नाव आहे. ती सध्या भारत-चीन सीमेवरील नाभिधांग या प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदारित्या वास्तव्य करून आहे. ही जागा सोडण्यास तिने नकार दिला आहे.

पोलिसपथक पाठविणार

हरमिंदर कौर यांना परत आणण्यासाठी शुक्रवारी आरोग्य कर्मचाऱ्यांसह १२ सदस्यीय पोलिसांचे पथक पाठविण्याची योजना आखली आहे. पोलिसांच्या मते, ही महिला मानसिकदृष्ट्‌या स्थिर नसल्याचे दिसून येत आहे. कारण ती स्वत: पार्वती मातेचा अवतार असल्याचे सांगत असून महादेवाशी विवाह करण्यासाठी आलो आहोत, असे म्हणत आहे. गुंजी हे कैलास मानसरोवरच्या मार्गावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.