लुधियाना स्फोटानंतर तपास यंत्रणांना मोठ्या घातपाताचा संशय

Ludhiana
LudhianaTeam eSakal
Updated on

गुरुवारी लुधियाना (Ludhiana) कोर्ट बॉम्बस्फोटात घातक (Pentaerythritol tetranitrate) स्फोटकं वापरली गेली आहेत. फॉरेन्सिक टीम तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने प्राथमिक तपासणीनंतर ही माहिती दिली आहे. पंजाबमध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत.

Ludhiana
UP Elections पुढे ढकला, सभांवर बंदी घाला - अलाहाबाद हायकोर्ट

पंजामधील लुधियाना शहरात असलेल्या जिल्हा सत्र न्यायालयात स्फोट झाला होता. या स्फोटानं पुन्हा एकदा पंजाबला हाय अलर्ट देण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार जिल्हा सत्र न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील शौचालयात दुपारी साडेबाराच्या दरम्यान हा स्फोट घडवण्यात आला आहे. पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असून, चाचण्यांमधून बॉम्ब नेमक्या कोणत्या प्रकारचा होता हे कळणार आहे.

Ludhiana
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी महिनाभरासाठी तुरुंगाबाहेर

दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, लुधियाना न्यायालयातील बॉम्बस्फोटातील पीडितेची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह अत्यंत विकृत झाल्याने ओळख पटू शकलेली नाही. शरीरावर फक्त एक टॅटू दिसत होता, ज्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटू शकलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.