Rajasthan : विधानसभेत नेण्यासाठी आणलेली गाय पळून गेली; संतापलेल्या भाजप आमदारानं पत्रकारांनाच..

'तुम्हाला तिच्यापासून अंतर राखून उभं राहायला हवं होतं. तुमच्यामुळं माझ्याभोवती गर्दी गोळा झाली.'
BJP MLA Suresh Singh Rawat
BJP MLA Suresh Singh Rawatesakal
Updated on
Summary

'तुम्हाला तिच्यापासून अंतर राखून उभं राहायला हवं होतं. तुमच्यामुळं माझ्याभोवती गर्दी गोळा झाली.'

सध्या देशातील पशुपालक चिंतेत आहेत. कारण, जनावरांवर लम्पी स्कीनचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन भाजपनं राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारला घेरायला सुरुवात केली आहे.

एका भाजप आमदारानं (BJP MLA) राजस्थान विधानसभेत (Rajasthan Legislative Assembly) नेण्यासाठी आणलेली गाय पळून गेल्याने त्यांची चांगलीच फजिती झाली. त्याचं झालं असं की, अजमेरच्या पुष्कर येथील भाजप आमदार सुरेश सिंह रावत (Suresh Singh Rawat) हे सोमवारी राजस्थान विधानसभेत जायला निघाले. त्यांनी गेहलोत यांच्या सरकारवर टीका करण्यासाठी सोबत गायीला (Cow) देखील घेतलं होतं.

BJP MLA Suresh Singh Rawat
ED CBI : केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगामागं नरेंद्र मोदींचा हात नाही; ममता बॅनर्जी स्पष्टच बोलल्या, पण..

गोंधळ ऐकून बिथरलेली गाय तिथून पळून गेली

विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ रावत जसे आले, तसं त्यांना पत्रकारांनी वेढा घातला. रावत यांना पत्रकारांशी बोलताना पाहून आजूबाजूला गर्दी जमा होऊ लागली. हा गोंधळ ऐकून बिथरलेली गाय तिथून पळून गेली. ते पाहून रावत चांगलेच संतापले. त्यांनी त्यांचा राग पत्रकारांवर काढला. आपल्याला पत्रकारांनी घेरल्यामुळं ही गाय पळून गेली, अशी प्रतिक्रिया रावत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. गोमाता प्रवेशद्वाराजवळ आली, तेव्हा तुम्ही सगळे तिच्यासमोर कॅमेरे घेऊन उभे राहिलात. तुम्हाला तिच्यापासून अंतर राखून उभं राहायला हवं होतं. तुमच्यामुळं माझ्याभोवती गर्दी गोळा झाली आणि गोमाता तिथून पळून गेली, असं संतापून रावत यांनी पत्रकारांना चांगलंच सुनावलं.

BJP MLA Suresh Singh Rawat
Congress : अध्यक्षपदाची चर्चा सुरु असतानाच सोनिया गांधींचं 'या' बड्या नेत्याला दिल्लीत बोलावणं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.