एकत्र बसून तोडगा काढा : वेंकय्या नायडू

विधेयकाला मंजुरी घेतेवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते एल्लमारम करीम यांनी एका कलमावर अचानक मतविभाजन मागितले तेव्हा भाजपच्या गोटात धाकधूक सुरू झाली. कारण मतविभाजन झाले असते तर सत्तारूढ पक्षाकडील खासदारांची संख्या कमी असल्याने सरकारचा त्यात पराभव होणार हे उघडपणे दिसत होते.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांनी ‘एनडीटीव्ही’वरील कारवाईचे समर्थन केले.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांनी ‘एनडीटीव्ही’वरील कारवाईचे समर्थन केले.sakal
Updated on

नवी दिल्ली : पेगॅसस (Pegasus) पाळतप्रकरणी संसदेत सुरू असलेल्या गदारोळावर तोडगा काढण्यासाठी सत्तारूढ भाजप (BJP) व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी चर्चा करावी असे आवाहन राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू (M Venkaiah Naidu) यांनी पुन्हा केले आहे. राज्यसभेत आजही तृणमूल कॉंग्रेस (trinamool congress) व कॉंग्रेससह (congress) विरोधी सदस्यांच्या गदारोळामुळे कामकाज चालू शकले नाही. (M Venkaiah Naidu say Sit together and come up with a solution)

या गोंधळातच अर्थमंत्रालयाचे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. विधेयकाला मंजुरी घेतेवेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते एल्लमारम करीम यांनी एका कलमावर अचानक मतविभाजन मागितले तेव्हा भाजपच्या गोटात धाकधूक सुरू झाली. कारण मतविभाजन झाले असते तर सत्तारूढ पक्षाकडील खासदारांची संख्या कमी असल्याने सरकारचा त्यात पराभव होणार हे उघडपणे दिसत होते. त्यानंतर सभागृह नेते पियूष गोयल, भाजपाध्यक्ष जे. पी नड्डा व मुख्य प्रतोद मुख्तार अब्बास नक्वी यांनी वेगाने हालचाली केल्या. पीठासीन अधिकारी भुवनेश्वर कलिता यांनी करीम यांची मतविभाजनाची मागणी तांत्रिक कारणावरून नाकारली व विधेयकाचा मार्ग मोकळा झाला.

गेले अडीच आठवडे संसदेत कामकाज होत नसल्याबद्दल राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी खंत व्यक्त केली. त्यांनी आज विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, गोयल व अन्य मंत्र्यांशी वारंवार चर्चा केली. गोंधळ थांबविण्याचा प्रमुख मार्ग चर्चा हाच असतो त्यामुळे तुम्ही परस्परांत वारंवार चर्चा करा असे आवाहन नायडू यांनी केले.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वेंकय्या नायडू यांनी ‘एनडीटीव्ही’वरील कारवाईचे समर्थन केले.
..हा तर संसदेचा अपमान

...नड्डांनी मास्क घातला

तृणमूल कॉंग्रेसच्या अर्पिता घोष भाजपच्या बाकांकडे पाहून जोरजोरात घोषणा देत होत्या. सत्तारूढ बाकांवर पहिल्या रांगेत बसलेले भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना गोयल जोरजोरात काही तरी सांगत होते पण त्यांच्यापर्यंत काही पोहोचत नव्हते. अखेर गोयल त्यांच्या जागेवरून उठून नड्डा यांच्याजवळ येऊन बसले व त्यांनी, घोष या मास्क न लावता तुमच्या अगदी जवळ येऊन घोषणा देत आहेत. तुम्ही त्वरित मास्क लावा असे सांगितले. त्यानंतर नड्डा यांनी घाईघाईने खिशातील मास्क काढून तोंडावर लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.