'मधु का पांचवा बच्चा'; आधार कार्ड झालं व्हायरल

उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये आधार कार्ड बनवताना निष्काळजीपणा समोर आला आहे
madhus fifth child written in place of name in aadhar card
madhus fifth child written in place of name in aadhar card
Updated on

उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये आधार कार्ड बनवताना निष्काळजीपणा समोर आला आहे. तो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. हा निष्काळजीपणा पाहून आधार कार्ड बनवणारे लोक किती बेफिकीर आहेत असं मनात येईल. आधार कार्ड मिळाल्यानंतर दोन वर्षांनी पालक आपल्या मुलाला शाळेत प्रवेश मिळावा यासाठी शाळेत गेले होते तेव्हा ही बाब उघडकीस आली. हे आधार कार्ड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

madhus fifth child written in place of name in aadhar card
निळू फुलेंवर येणार चित्रपट! 'हा' अभिनेता करणार दिग्दर्शन

राज्यातील बदायूंतील तहसील भागातील बिलसी येथील एका गावात एक व्यक्ती आपल्या मुलाचा शालेय प्रवेश घेण्यासाठी प्राथमिक शाळेत गेले होते. , तेव्हा शिक्षकाने त्याला शाळेत प्रवेश देण्यास नकार दिला. कारण आधार कार्डवर मुलाचे नाव वेगळेच लिहिले होते. मुलाचे नाव लिहिले होते मधु का पाचवा बच्चा. आधार कार्डवर असे नाव दिसल्यानंतर शिक्षकाने मुलाच्या वडिलांना ते दुरुस्त करण्यास सांगितले. बिलसी तहसील भागातील रायपूर गावात राहणाऱ्या दिनेश यांना 5 मुले आहेत. त्यांची तीन मुले गावातीलच प्राथमिक शाळेत शिकतात. दिनेश आपल्या मुलीला शाळेत प्रवेश घेण्यासाठी शाळेत गेले होते. तेव्हा तेथे शिक्षिका एकता वार्ष्णेय यांनी नावनोंदणीची औपचारिकता पूर्ण करून मुलीचे आधार कार्ड पाहून आश्चर्य व्यक्त केले. आधार कार्डमध्ये मुलीच्या नावाऐवजी आरतीचे नाव 'मधु का पांचवां बच्चा' असे लिहिले होते. यासोबतच आधार कार्डवर आधार क्रमांक टाकला नसल्याचे दिसून आले.

madhus fifth child written in place of name in aadhar card
मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे आहेत ७ मार्ग

कारवाई होणार

आधारकार्डमध्ये अशाप्रकारे निष्काळजीपणा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बदायूँच्या जिल्हा दंडाधिकारी दीपा रंजन यांनी पोस्ट आणि बॅंकाच्या अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच असा निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

madhus fifth child written in place of name in aadhar card
Weight Loss : उन्हाळ्यात फणस खाल्ल्याने होतात 5 फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.