भोपाळ- मध्य प्रदेशातील डिंडोरीमध्ये भीषण अपघात झाला आहे. त्यात १४ जणांना मृत्यू झालाय तर २० जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बडझर घाटात हा दुर्दैवी अपघात घडला. पिकअप वाहन अनियंत्रित होऊन पलटले. त्यामुळे ही घटना घडली. (Madhya Pradesh 14 people died pickup vehicle lost control and overturned)
अपघात इतका भीषण होता की १४ जणांचा जागीच मृत्यू झालाय. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना ४-४ लाखांची मदत जाहीर केली आहे. एक्सवर पोस्ट करुन त्यांनी यासंदर्भातील माहिती दिलीये.
मिळालेलेल्या माहितीनुसार, सर्वजण एक कार्यक्रम करुन घरी परतत होते. जखमींना शहपुरा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काही जणांची स्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. दिंडोरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
मोहन यादव म्हणाले की, मृत व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांच्या कुटुंबांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ४-४ लाख रुपये देण्यात येतील. जखमींवर आवश्यक उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.