मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये प्रचार सांगता! दोन्ही राज्यांत उद्या मतदान

Madhya Pradesh and Chhattisgarh Election
Madhya Pradesh and Chhattisgarh Election
Updated on

Madhya Pradesh and Chhattisgarh Election: १५ दिवसांपासून सुरू असलेल्या तुफानी प्रचाराची सांगता आज मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये झाली. या दोन्ही राज्यांमध्ये शुक्रवारी (ता.१७) मतदान होणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात २३० विधानसभा मतदारसंघांमध्ये तर छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ७० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल. छत्तीसगडच्या ९० सदस्यीय विधानसभेसाठी २० मतदारसंघांमध्ये गेल्या ७ नोव्हेंबरला मतदान पार पडले आहे. या दोन्ही राज्यांत भाजप व काँग्रेस हेच दोन्ही पक्ष प्रामुख्याने आमनेसामने आहेत.

मध्य प्रदेशमध्ये भाजप तर छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तारूढ आहे. गेल्या १८ वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये असलेली शिवराजसिंह चौहान यांची राजवट बदलण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे तर भाजपकडून डबल इंजिनचे सरकार मध्य प्रदेशसाठी कसे उपयुक्त आहे, याचा पाढा वाचला जात आहे.

दोन्ही राज्यांमध्ये दोन्ही पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन व निवडणुकीत प्रचार केला. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय भूपृष्ठमंत्री वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी शिवराजसिंह चौहान यांच्यासाठी प्रचार केला.

Madhya Pradesh and Chhattisgarh Election
सत्तेत असणाऱ्या 'या' आरोपी नेत्यांवर कारवाई का नाही? अद्वय हिरे अटकेवरुन ठाकरे गट आक्रमक

लाडली बहना योजना, ८० कोटी लोकांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत धान्य योजना या योजनांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ‘मुर्खो का सरदार’ असा उल्लेख करून काँग्रेसच्या नेतृत्वावर हल्लाबोल केला. काँग्रेसकडून प्रचार केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी प्रामुख्याने प्रचार केला.

काँग्रेसकडून कोंडीचा प्रयत्न

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजपला धक्का बसला आहे. यात १०० कोटीं रुपयांपेक्षा अधिक रुपयांची मागणी केल्याने भाजपच्या नेत्यांना यावर उत्तर देता आले नाही. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांसाठी मोफत धान्य देण्याची योजना व आदिवासींसाठी २४ हजार कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा केल्याने काँग्रेसने या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पंतप्रधान मोदींवर टीका केल्यावरून प्रियांका गांधी यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

Madhya Pradesh and Chhattisgarh Election
महाराष्ट्र सर्वाधिक शेतकरी आत्महत्या तर तेलंगणात शून्य; BRS चा हल्लाबोल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.