'किसीं की भी सरकार आये, बस्स मजे कर रही हैं..'; तरुणाईत सरकारविरोधात संताप, मतदान कोणाच्या पारड्यात?

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे.
Madhya Pradesh Assembly Elections
Madhya Pradesh Assembly Electionsesakal
Updated on
Summary

गोरगरीब आणि खेड्यापाड्यात राहणाऱ्या शिक्षण पूर्ण न करू शकणाऱ्या तरुणांना आर्मीत नोकरीची संधी होती, ती सुद्धा हिरावली गेलीये.

-नरेश हाळनोर

Madhya Pradesh Assembly Elections : बेरोजगारी, वाढती महागाई, पेपरफुटी, भ्रष्टाचार यामुळे वैतागलेली तरुणाई राज्यात कोणतेही सरकार येवो ते फक्त मजा करतात. सत्तेत येणाऱ्यांना राज्याच्या कोणत्याही समस्येची देणे-घेणे नाही. सत्तेत येण्यासाठी फक्त घोषणा केल्या जातात. प्रत्यक्ष त्या घोषणा सत्तेत आल्यानंतर सोयीस्करपणे विसरतात.

आम्ही तरुण मात्र या लोकांच्या हातचे भावली बनून राहतो अशा शब्दात तरुणाई व्यक्त होत आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शिक्षणाच्या निमित्ताने, तसेच सैर सपाटा न्यू मार्केट या परिसरात आलेल्या तरुणांशी संवाद साधला असता त्यांनी आपली मतं बिनधास्तपणे व्यक्त केली.

Madhya Pradesh Assembly Elections
Loksabha Election : लोकसभेपूर्वी राष्ट्रीय पक्षांसाठी रंगीत तालीम! तालुका, जिल्हा पंचायतीच्या निवडणुका 'या' महिन्यात होणार

सतना इथून भोपाळमध्ये शिक्षणासाठी आलेल्या शुभम सैन म्हणतो की, आर्मी भरतीसाठी दहावी झाल्यापासून प्रयत्न करत होतो. भरती झाली नाही. नंतर शासनाने अग्निवीर भरती सुरू केली. या भरतीला विरोध व्हा म्हणून अनेकांनी आत्महत्या केल्या. त्याचा सरकारवर काहीच परिणाम झाला नाही. चार वर्षे नोकरी करून आलेल्याला कुठलाही मोबदला मिळणार नाही. मग, त्याचा उपयोग काय? गोरगरीब आणि खेड्यापाड्यात राहणाऱ्या शिक्षण पूर्ण न करू शकणाऱ्या तरुणांना आर्मीत नोकरीची संधी होती, ती सुद्धा हिरावली गेली.

Madhya Pradesh Assembly Elections
'मध्यप्रदेश' कोणाच्या हातात? 'या' मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये काटे की टक्कर, गड राखण्याचं दोन्ही पक्षांना आव्हान

राज्यात पेपर फुटी होऊन परीक्षा रद्द होत आहेत. नव्याने भरती होत नाही. खासगी क्षेत्रात नौकऱ्या नाहीत. आम्ही काय करायचं, असा उद्दिग्न सवाल त्याने केला. प्रकाश गौर याने, महागाई दिवसेंदिवस वाढते आहे, त्या तुलनेत उत्पन्न वाढत नाही. शेतकऱ्याचा गहू 15 रुपयांनी घेतला जातो. पण, बाजारात तोच गहू 45 रुपये किलोने विकला जातो.

Madhya Pradesh Assembly Elections
Maratha Reservation : PM मोदींना भेटल्यावरच मराठा आरक्षणाचा तोडगा निघेल, अन्यथा..; काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

तेल 160 रुपये, पेट्रोल 110 रुपये, रेल्वेचे तिकीट किमान 50 रुपयांनी वाढले. 25 वर्षाचा होऊनही हाताला काम नाही. सरकारी नौकरीसाठी भरती नाही, प्रत्येक वेळी पेपर लीक होतो. 250 जागांसाठी 25 लाख अर्ज येतात. काय करायचं आम्ही? अशा शब्दात आपली व्यथा मांडली. रामचरण सिंह याने, कोरोनाकाळात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोना झाला तर ते खासगी हॉस्पिटलमध्ये भरती झाले, का त्यांना सरकारी हॉस्पिटलवर विश्वास नव्हता का? असा प्रश्नही उपस्थित केला गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()