Madhya Pradesh Politics : भाजपने रिपोर्टऐवजी ‘रेटकार्ड’जारी करावे; काँग्रेस नेत्याची मध्य प्रदेश सरकारवर टीका

मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होत असून राजकीय वातावरण तापले आहे.
mallikarjun kharge and kamalnath
mallikarjun kharge and kamalnathsakal
Updated on

भोपाळ - मध्यप्रदेशात वीस वर्षे राज्य करूनही भाजप अजूनही गरीबांच्या कल्याणाच्याच गोष्टी करत आहे. याचाच अर्थ भाजपच्या दोन दशकांच्या राजवटीत एक तर लोक गरिबीतून बाहेर आले नसतील किंवा गरीब होत गेले असतील, अशा शब्दांत कॉंग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी टीका केली.

दोन्ही आघाड्यांवर मध्य प्रदेशातील शिवराज चौहान सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येते, असे कमलनाथ म्हणाले. भाजपने रिपोर्टकार्ड ऐवजी ‘रेटकार्ड’ प्रसिद्ध करायला हवे होते, असेही ते यावेळी म्हणाले.

मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होत असून राजकीय वातावरण तापले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी २००३ ते २०२३ या काळातील मध्य प्रदेश सरकारचे रिपोर्ट कार्ड जारी केले. या रिपोर्टकार्डमध्ये भाजपला आपल्या राजवटीत मध्यप्रदेशचा ‘बिमारू श्रेणी’ चा टॅग हटविण्यात यश आल्याचा दावा करण्यात आला.

शहांच्या दाव्यावर बोलताना कमलनाथ म्हणाले, की भाजपने एक रिपोर्ट कार्ड जारी केले असून त्याऐवजी त्यांनी रेट कार्ड जारी करायला हवे होते. सध्या सर्वाचे दर काय आहेत, हे सांगायला हवे होते. ते गेल्या वीस वर्षाचे बोलत आहेत आणि आम्ही मात्र पुढच्या वीस वर्षाचे बोलत आहोत.

मध्य प्रदेशची ५० टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारपासून मुक्तता करावी, असे आवाहन कमलनाथ यांनी उज्जैनच्या भगवान महाकाल यांना आवाहन केले. ‘एक्स’वर केलेल्या एका पोस्टमध्ये कमलनाथ म्हणाले, की भाजपने आपल्या दोन दशकांच्या राजवटीत गरिबांचे कल्याण केल्याचे सांगत आहेत.

याचा थेट अर्थ असा की, भाजपच्या वीस वर्षाच्या काळात एक तर लोक गरिबीतून बाहेर पडले नसतील किंवा गरीब होत गेले असतील. या दोन्ही आघाडीत भाजप सरकारचे अपयश दिसून येते. या रिपोर्टकार्डमध्ये ते अपयशी ठरल्याचे दिसून येते.

कागदावर विकासाचे खोटेनाटे चित्र मांडत आहेत आणि आम्ही मात्र खऱ्या हमीसह येत आहोत. कॉंग्रेस पक्ष गरीब व्यक्ती, शेतकरी, मजूर, तरुण, महिला, लहान मोठे कारागीर आणि व्यापाऱ्याच्या विकासासाठी काम करत आहे, असा दावा कमलनाथ यांनी केला.

रस्ते, पूल आणि निरपयोगी योजनांच्या देखावा केल्याने काही साध्य होणार नाही. जोपर्यंत व्यक्तीचा विकास होत नाही, कुटुंबात समाधानाचे वातावरण नाही, तोपर्यंत या गोष्टीला काही अर्थ नाही. प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी सकारात्मक वातावरण तयार करायला हवे आणि नंतर आपोआप विकासाचा रथ सुरू राहील.

- कमलनाथ, माजी मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()