या निवडणुकीत भाजपनं 380 मुस्लिमांना नगरसेवक म्हणून उमेदवारी दिली होती.
Madhya Pradesh Civil Election : भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचं मूल्यमापन केल्यास ते निवडणुकीत मुस्लिम उमेदवार उभं करण्याचं टाळत असल्याचं दिसून येईल. अनेक निवडणुकांमध्ये भाजपनं एकाही मुस्लिमाला तिकीट दिलं नाही. मात्र, मध्य प्रदेशच्या नागरी निवडणुकीत भाजपचा रंग वेगळा दिसत होता.
या निवडणुकीत भाजपनं 380 मुस्लिमांना नगरसेवक म्हणून उमेदवारी दिली. मात्र, त्यापैकी केवळ 92 उमेदवारांनाच निवडणूक जिंकता आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापैकी भाजपच्या मुस्लिम उमेदवारांनी 25 ठिकाणी काँग्रेसच्या हिंदू उमेदवारांचा पराभव केलाय. तर, दुसरीकडं काँग्रेसनं यावेळी 450 मुस्लिमांना नगरसेवकपदाचं तिकीट दिलं होतं, त्यापैकी 344 विजयी झाले आहेत.
मध्य प्रदेशात आतापर्यंत झालेल्या सहा शहरी नागरी निवडणुकांमध्ये ही पहिलीच वेळ होती, जेव्हा भाजपनं मुस्लिम उमेदवारांपासून मागं हटलं नाही आणि 6671 नगरसेवकांपैकी 380 मुस्लिम उमेदवार उभे केले.
मध्य प्रदेश नागरी निवडणुकीत भाजपनं 380 मुस्लिम उमेदवारांना नगरसेवक म्हणून तिकीट दिलं, त्यापैकी 92 विजयी झाले. त्याचवेळी 209 प्रभागांत मुस्लिम उमेदवार पराभूत झाले.
भाजपनं जिंकलेल्या डझनभर नगरपालिका आणि नगरपरिषदा आहेत, जिथं विजयी मुस्लिम नगरसेवक सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
25 ठिकाणी भाजपच्या मुस्लिम उमेदवारांनी काँग्रेसच्या हिंदू उमेदवारांचा पराभव केला. 209 प्रभागांत मुस्लिम उमेदवार पराभूत झाले असले, तरी ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
अनुपपूरमध्ये भाजपचे अब्दुल कलाम यांनी काँग्रेसचे अशोक त्रिपाठी यांचा पराभव केला. कटनीमध्ये मोहम्मद अयाज यांनी काँग्रेसच्या मोहनलाल यांचा पराभव केला. उज्जैनमध्ये भाजपच्या उमेदवार आबिदा यांनी काँग्रेसच्या वैशाली यांचा पराभव केला.
छतरपूरमध्ये अक्रम खान आणि अनिशा खान बिनविरोध विजयी झाले. तर ग्वाल्हेर, खांडवा, देवास, नर्मदापुरम, नरसिंगपूरमध्ये प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले. त्याचवेळी राज्याची राजधानी भोपाळ, इंदूर आणि जबलपूरमध्ये भाजपनं मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं नाही. मात्र, काँग्रेसच्या तुलनेत भाजपनं फार कमी उमेदवार उभे केले नाहीत.
या निवडणुकीत काँग्रेसनं 450 मुस्लिमांना तिकीट देऊन उभं केलं होतं. यापैकी 344 उमेदवारांनी विजयही नोंदवला आहे.
काँग्रेसनं 2014 च्या तुलनेत यावेळी जास्त मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलं होतं. 2014 मध्ये काँग्रेसनं सुमारे 400 मुस्लिम उमेदवार उभे केले होते.
2014 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत सुमारे 60.41 टक्के मतदान झालं होतं. मात्र, यावेळी 1.66 टक्क्यांनी कमी झालं. म्हणजेच, यावेळी एकूण मतदानाची टक्केवारी 60.05 इतकी होती.
कमी मतदान झाल्याने भाजपच्या हातून 7 नगरपालिकांच्या जागा गेल्या. यामध्ये काँग्रेस 5, आम आदमी पार्टी एक आणि एक वर अपक्ष उमेदवार विजयी झाले.
2014 मध्ये मध्य प्रदेशच्या नगरपालिका निवडणुकीत भाजपनं 98 पैकी 54 नगरपालिका जिंकल्या होत्या. त्याचबरोबर 76 पैकी 65 नगरपालिका यावेळी जिंकल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.