PM Modi : मोदींच्या वाढदिवसाला शिवराज देणार चित्ता प्रोजेक्टचं गिफ्ट, काय आहे प्लॅन?

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करायचे आहे.
shivraj singh chouhan pm modi
shivraj singh chouhan pm modi
Updated on
Summary

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करायचे आहे.

मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो वन्यजीव अभयारण्यात लवकरच चित्ते दाखल होणार आहेत. नमीबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणले जाणारे सुमारे 8 चित्ते येथे ठेवण्याची तयारी सुरू आहे. वन्यजीव अभयारण्याचे अधिकारी याबाबत तयारी करत असून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चित्ता ट्रान्सलोकेशन प्रकल्पाचा आढावा घेतला. दरम्यान, चौहान यांनी या कामाला गती देण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करायचे आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कुनो वन्यजीव अभयारण्यात चित्ता ट्रान्सलोकेशन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित करायचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचा या दिवशी वाढदिवस असल्याने मध्य प्रदेश सरकारला त्यांना आमंत्रित करायचे आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी सोयीस्कर तारखेची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आले आहे, अशी माहिती मिळत आहे.

shivraj singh chouhan pm modi
Agniveer Test : भरतीत अपयशी ठरलेल्या 23 वर्षीय युवकाची आत्महत्या

कुनो अभयारण्यात परदेशातून येणाऱ्या चित्त्यांना ठेवण्याची तयारी सुरू आहे. मात्र येथील बिबट्या हे अधिकाऱ्यांच्या चिंतेचे कारण बनले आहेत. अभयारण्यात चित्ते आणण्यासाठी वातावरण अनुकूल असले तरी बिबट्या या मार्गात उभा असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत या बिबट्यांना हुसकावून लावले जात नाही, तोपर्यंत चित्त्यांना नेता येणार नाही, असंही त्यांनी सूचवले आहे. यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातही अडचणी निर्माण झाल्या आहेत.

चित्त्यांच्या परिसरात सुरक्षेची काळजी घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अडथळा ठरणाऱ्या बिबट्यांना सुरक्षित पकडून नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पिंजऱ्यात आमिषे दाखवून त्यांना अडकवण्याचे प्रयत्न व्यर्थ जात आहेत. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी दोन हत्तीही आणले होते परंतु त्याचाही उपयोग झालेला नाही. बिबट्यांनी कुंपणावर चढू नये यासाठी वनपालांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.

shivraj singh chouhan pm modi
Ambani : अंबानींचा दुबईतला सर्वात महागडा व्हिला! SRK अन् बेकहॅम होणार शेजारी, पाहा किंमत

मध्य प्रदेश वन विभागाने चीता प्रोजेक्ट पोस्टिंगसाठी स्वयंसेवकांनाही आपल्या कर्मचाऱ्यांना आमंत्रित केले आहे. कुनो वन्यजीव क्षेत्रात क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीची गरज असल्याचा संदेश विभागाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविण्यात आला असून इच्छुकांनी परिक्षेत्र अधिकारी, उप रेंजर, वनपाल यांच्याकडे अर्ज करू शकतात. आपण मुख्य वन्यजीव वॉर्डनशीही संपर्क करु शकता. त्यांची नियुक्ती प्रशासकीय पातळीवर होणार आहे. अशा स्वयंसेवकांना शोधण्यात सहभाग घेण्याचे आदेश वनप्रधान सचिवांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.