'ज्यांना स्वत:चं सरकार वाचवता आलं नाही, त्यांना महाराष्ट्रात पाठवलं'

Kamal Nath vs Shivraj Singh Chouhan
Kamal Nath vs Shivraj Singh Chouhanesakal
Updated on
Summary

महाराष्ट्रातील असंतोष शमवण्यासाठी काँग्रेस हायकमांडनं कमलनाथ यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.

भोपाळ : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर एकनाथ संभाजी शिंदे (CM Eknath Sambhaji Shinde) यांनी गुरुवारी सायंकाळी राज्याचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. हा असंतोष शमवण्यासाठी काँग्रेस हायकमांडनं (Congress High Command) मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांच्याकडं कमान सोपवली होती; पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan) यांनी त्यांना टोला लगावलाय. शिवराज सिंह म्हणाले, आपलंच सरकार वाचवू न शकलेल्या कमलनाथ यांना महाराष्ट्राचं सरकार (Government of Maharashtra) वाचवण्यासाठी काँग्रेसनं पाठवलं, हे आश्चर्यकारक आहे. मात्र, तिथं काय झालं हे तुम्ही पाहू शकता, असा टोला त्यांनी लगावलाय. मुख्यमंत्री गुरुवारी जबलपूरमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी नगरपालिकांच्या निवडणुकीमुळं जबलपूरमध्ये रोड शो केला. सायंकाळी 6.15 च्या सुमारास डुमना विमानतळावर पोहोचल्यानंतर कांचघर जकात नाका येथून शिवराज सिंह यांनी रोड शो'ला सुरू केली.

Kamal Nath vs Shivraj Singh Chouhan
1989 च्या दंगलीत मुंबई होरपळत होती, तेव्हा एकनाथ शिंदेंनी वाचवला एका मुलाचा जीव

त्यानंतर पूर्व विधानसभेतून मार्गक्रमण करून ते उत्तर विधानसभेत पोहोचले. सुमारे 23 किमी लांबीच्या या रोड शोमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जबलपूर (Jabalpur) शहरातील 3 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. त्यांनी सर्वसामान्यांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं. सुमारे 4 तास चाललेल्या या रोड शो'ची सांगता मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते नर्मदा पूजन करून करण्यात आली. दरम्यान, आचारसंहितेच्या नियमांचं पालन करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रात्री 10 वाजण्यापूर्वी आपला रोड शो संपवला. त्यानंतर त्यांनी आपल्या गाडीतून ग्वारीघाटकडं प्रयाण केलं आणि नर्मदेची पूजा करून रोड शो'ची सांगता केली. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधत कमलनाथ यांना महापौरपदाच्या निवडणुकीत रस नसताना ते जबलपूरला का आलेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Kamal Nath vs Shivraj Singh Chouhan
इस्रायलमध्ये राजकीय संकट; 4 वर्षात पाचव्यांदा होणार निवडणुका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()