मुस्लिमांच्या हत्याकांडावर चित्रपटाची केली मागणी; IAS अधिकाऱ्याला सरकारकडून नोटीस

मुस्लिमांच्या हत्याकांडावर चित्रपटाची केली मागणी; IAS अधिकाऱ्याला सरकारकडून नोटीस
Updated on

भोपाळ: मध्य प्रदेश सरकार बुधवारी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावरील वादग्रस्त ट्विटबद्दल आयएएस अधिकारी नियाज खान यांना नोटीस बजावणार आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे ट्विट सरकारी अधिकार्‍यांसाठी ठरवलेल्या मर्यादा ओलांडत आहेत आणि त्यांचे उल्लंघन करत आहेत. (IAS officer Niyaz Khan)

मुस्लिमांच्या हत्याकांडावर चित्रपटाची केली मागणी; IAS अधिकाऱ्याला सरकारकडून नोटीस
बिरभूम घटनेची कलकत्ता उच्च न्यायालयाने घेतली दखल, आज घेणार सुनावणी

काश्मीर फाईल्स चित्रपटाबाबत आपलं सडेतोड मत मांडणारे IAS अधिकारी नियाज खान यांना मध्य प्रदेश सरकारने आज बुधवारी नोटीस बजावली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या सांगण्यानुसार, सरकारी अधिकाऱ्यांसाठी ठरवलेल्या मर्यादा ओलांडणारं त्यांचं ट्विट असून ते या मर्यादांचं उल्लंघन करत आहेत. मी नियाज खान यांचे ट्विट्स पाहिले आहेत. हे एक गंभीर प्रकरण आहे. सरकारी अधिकाऱ्यांना घालून दिलेल्या लक्ष्मण रेषेचं उल्लंघन ते करत आहेत. राज्य सरकार त्यांना एक कारणे-दाखवा नोटीस पाठवेल आणि त्यांना उत्तर मागवलं जाईल, असं राज्याच्या गृहमंत्र्यांनी म्हटलंय.

आयएएस नियाज खान हे मध्य प्रदेशातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) उपसचिव आहेत. त्यांनी काश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल गेल्या आठवड्यात काही ट्विट्स केले होते. तसेच त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना वेगवेगळ्या राज्यात मोठ्या संख्येने होणाऱ्या मुस्लिमांच्या हत्यांवरही चित्रपट बनवण्याचे आवाहन केलं होतं. काश्मीर फाइल्स ब्राह्मणांच्या वेदना दाखवते. त्यांना काश्मीरमध्ये सर्व सन्मानाने सुरक्षितपणे राहू दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर निर्मात्यांनी अनेक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिमांच्या होणाऱ्या हत्या दाखवण्यासाठीही एक चित्रपट बनवला पाहिजे. मुस्लिम हे कीटक नसून मानव आणि देशाचे नागरिक आहेत, असं त्यांनी लिहिलं होतं.

मुस्लिमांच्या हत्याकांडावर चित्रपटाची केली मागणी; IAS अधिकाऱ्याला सरकारकडून नोटीस
मुस्लिमांच्या हत्येवर यावा 'काश्मिर फाईल्स', IAS अधिकारी 'Script' लिहिणार

पुढे ते म्हणाले होते की, मुस्लिमांच्या हत्याकांडावर प्रकाश टाकणारं एक पुस्तक लिहिण्याचं त्यांच्या मनात आहे. वेगवेगळ्या प्रसंगी मुस्लिमांचे हत्याकांड घडलंय. आणि ते दाखवण्यासाठी एक पुस्तक लिहिण्याचा ते विचार करत आहोत, जेणेकरून अल्पसंख्याकांच्या वेदना भारतीयांसमोर मांडता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.