...त्यामुळे महिला शूर्पणखा दिसतात; केंद्रीयमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचं महिला मंत्र्याकडून समर्थन

kailash vijayvargiya and Usha Thakur
kailash vijayvargiya and Usha Thakur
Updated on

इंदूर : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी नुकतेच महिलांच्या पेहरावावर वादग्रस्त विधान केल आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र आता मध्य प्रदेशच्या संस्कृती आणि पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनीही भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

kailash vijayvargiya and Usha Thakur
Devendra Fadnavis: अचानक ठरलं! उपमुख्यमंत्री भाजप मंत्र्यांसोबत अयोध्येला, दौऱ्यामागे राजकीय खेळी?

उषा ठाकूर यांनी शनिवारी सांगितले की, "जर कोणी वैदिक सनातन परंपरेचे पालन करत नसेल, तर त्या व्यक्तीला राक्षस प्रवृत्ती आहे असे म्हटले जाईल."

भाजप नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते की, 'आम्ही महिलांना देवी मानतो, पण मुली असे अश्लील कपडे घालतात, ज्यामध्ये त्या 'शूर्पणखा' (लंका राजा रावणाची बहीण) सारख्या दिसतात. यासोबतच तरुणांमध्ये वाढत्या नशेच्या प्रवृत्तीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विभा पटेल म्हणाल्या, सत्तेच्या गर्वाने भाजप प्रतिष्ठा विसरत आहे.

kailash vijayvargiya and Usha Thakur
Devendra Fadnavis: अचानक ठरलं! उपमुख्यमंत्री भाजप मंत्र्यांसोबत अयोध्येला, दौऱ्यामागे राजकीय खेळी?

पटेल म्हणाल्या, "विजयवर्गीय कोणत्या जगात जगत आहेत? आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा, खाण्याचा आणि पिण्याचा अधिकार आहे. जर महिला त्यांच्या स्वातंत्र्याचा वापर करत असतील तर नक्कीच त्यात मर्यादा हव्याच, पण नेत्यांनी कोणतीही टिप्पणी करण्याआधी आपली शिष्टाई जपावी.

भाजपच्या प्रवक्त्या नेहा बग्गा बग्गा म्हणाल्या, "कैलाश विजयवर्गीय यांनी जे सांगितले ते समाजाच्या चिंतेचे आणि पालकांच्या चिंतेचे कारण आहे. काही वेळा मुलांना समजावण्यासाठी अशा भाषेचा वापर केला जातो आणि मला वाटते की, त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.