दोन डोकी, तीन हात.. महिलेनं दिला अनोख्या बाळाला जन्म

MY Hospital Indore
MY Hospital Indoreesakal
Updated on
Summary

रतलाम जिल्ह्यात एका महिलेनं अनोख्या मुलाला जन्म दिलाय.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाम जिल्ह्यात (Ratlam) एका महिलेनं अनोख्या मुलाला जन्म दिलाय. या बाळाला दोन डोकी आणि तीन हात आहेत. सध्या या बाळाला इंदूरमध्ये दाखल करण्यात आलंय. हे प्रकरण रतलाम जिल्ह्यातील असून जावरा इथं राहणाऱ्या शाहीननं या अनोख्या बाळाला जन्म दिलाय.

या मुलाला दोन डोकी आणि तीन हात आहेत. तिसरा हात दोन तोंडांच्या मागील बाजूस आहे. या मुलाला काही काळ रतलामच्या एसएनसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि तेथून त्या बाळाला इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये (MY Hospital Indore) रेफर करण्यात आलंय. सोनोग्राफीमध्ये हे बाळ जुळ्यासारखं दिसत होतं. एसएनसीयूचे प्रभारी डॉ. नावेद कुरेशी यांनी सांगितलं की, मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

MY Hospital Indore
ऑस्कर सोहळ्यातील 'थप्पड' प्रकरणानंतर विल स्मिथच्या पत्नीनं सोडलं मौन

डॉ. कुरेशी म्हणाले, अशा वेळी अनेक मुलं एकतर गर्भातच संपतात आणि मूल जन्माला आलं तरी ते केवळ 48 तास जगू शकतं. त्यामुळं शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध असला, तरी यानंतरही 60 ते 70 टक्के मुलं जगत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. याला डायसेफॅलिक पॅरापॅगस (Dicephalic Parapagus) असं म्हणतात. हा जुळ्यांचा एक दुर्मिळ प्रकार आहे, असं डॉ. ब्रजेश लाहोटी यांनी सांगितलं. सध्या मुलाला इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलच्या (MY Hospital) आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय, तर आईला रतलाम हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.