तुझ्या शिव्या ऐकल्या, आता...; काँग्रेसच्या माजी आमदाराला पक्षात घेताना भाजप नेत्याच्या मनातील शब्द आले तोंडावर

Senior Congress leaders join BJP: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला पडझड लागली आहे. लोकसभा निवडणुकीआधी अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत
 Congress Leaders join bjp
Congress Leaders join bjp
Updated on

नवी दिल्ली- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला पडझड लागली आहे. लोकसभा निवडणुकीआधी अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नुकतंच काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, माजी मंत्री गजेंद्र सिंह राजूखेडी आणि माजी आमदार संजय शुक्ला यांच्यासह अन्य काही नेत्यांनी भाजपचे भगवे वस्त्र खांद्यावर टाकले आहे.( Madhya Pradesh Senior Congress leaders Suresh Pachouri Sanjay Shukla join BJP ahead of LS polls)

कधीकाळी कट्टर विरोधक असलेले नेते आज मांडिला-मांडिला लावून बसत असल्याचं चित्र भाजपमध्ये दिसत आहेत. भाजपचे नेते कैलाश विजयवर्यीय यांनी हीच खदखद व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. भोपाळमधील भाजपच्या मुख्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात बोलणे सुरु होते. यावेळी विधानसभा निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले संजय शुक्ला यांना भगवा पटका घालताना विजयर्गीय म्हणालेत की, '#### तुझ्या शिव्या ऐकल्या आणि आता तुलाच पक्षात घेत आहे.'

 Congress Leaders join bjp
देशाला कायमचं कर्जात बुडवून मोदी एक दिवस संन्यासाला जातील; भाजप, काँग्रेससह पंतप्रधानांवर आंबेडकरांची सडकून टीका

२०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदौर-१ मतदारसंघातून संजय शुल्का काँग्रेसचे उमेदवार होते. शुक्ला यांनी भाजपचे उमेदवार असलेले कैलाश विजयवर्गीय यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पश्चिम बंगालमध्ये विजयवर्गीय यांच्यावर अनेक गुन्हे आहेत. त्यांनी भू-माफियांना आश्रय दिलाय असा आरोप त्यांनी केला होता. एका बैठकीमध्ये दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं.

संजय शुक्ला यांना ५७ हजार ७१९ मतांनी हरवून कैलाश विजयवर्गीय आमदार बनले. आता ते मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत. आज त्यांच्याच उपस्थित अनेक काँग्रेस नेत्यांचा भाजप प्रवेश होताय. संजय शुक्ला देखील भाजपमध्ये येत आहेत. त्यावेळी त्यांच्या मनातील शब्द तोंडावर आल्याचं बोललं जात आहे.

 Congress Leaders join bjp
Modi Ka Pariwar : भाजप नेते म्हणतायत 'मोदी का परिवार', पण पंतप्रधान मोदींच्या खऱ्या कुटुंबात नेमकं कोण-कोण? जाणून घ्या

कैलास विजयवर्गीय यांचे वक्तव्य ऐकून संजय शुक्ला हसायला लागले. आजूबाजूच्या नेत्यांमध्येही हास्य फुटले. शुक्ला कैलास विजयवर्गीय यांचे चरण स्पर्श करत म्हणतात की, 'तुमचाच मी मुलगा आहे.' यावेळी विजयवर्गीय यांनी शुक्ला यांची पाठ थोपटत त्यांना आशीर्वाद दिला. दरम्यान, संजय शुक्ला एका श्रीमंत कुटुंबातील आहेत. त्यांची संपत्ती २०० कोटींपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जातं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.