उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन येथे 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी पीडितेच्या मदतीसाठी पुढे आलेल्या राहुल शर्मा यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पीडित मुलगी गतीमंद असल्याचं सांगण्यात येत आहे.
राहुल शर्मा हे उज्जैन शहरापासून 15 किमी अंतरावर असलेल्या बदनगर रोडवर असलेल्या आश्रमाशी संबंधित आहेत. पीडित अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत ती मदतीची याचना करत होती, तेव्हा काही लोकांनी तिचा विनयभंग केला होता. अशा परिस्थितीत राहुल शर्मा यांनी तिची मदत केली.
राहुल शर्मा यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ते आश्रमाच्या बाहेर काही कामासाठी जात असताना त्यांना गेटजवळ एक अर्धनग्न अवस्थेत मुलगी दिसली. ते म्हणाले की, "मी तिला माझे कपडे दिले. तिचा रक्तस्त्राव होत होता. तिला बोलता येत नव्हतं. तिचे डोळे सुजले होते. मी 100 क्रमांकावर कॉल केला. मात्र हेल्पलाइनवर मला पोलिसांपर्यंत पोहोचता आले नाही, तेव्हा मी महाकाल पोलिसांना फोन केला. सुमारे 20 मिनिटांनी पोलिस आश्रमात पोहोचल्याचं शर्मा यांनी सांगितलं.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जखमी आणि अर्धनग्न मुलगी मदतीसाठी एका घरातून दुसऱ्या घराकडे जाताना दिसत आहे. मात्र तिला मदत मिळत नाही. यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती तिचा पाठलाग करताना दिसत आहे. यानंतर शेजारच्या आश्रमात पोहोचल्यानंतरच तिला मदत मिळाली.
पुजारी शर्मा म्हणाले की मुलगी त्यांच्याशी बोलत होती, पण तिचं बोलणं त्यांना नीट समजत नव्हतं. “आम्ही तिचे नाव विचारले, तिच्या कुटुंबाबद्दल विचारलं…आम्ही तिला खात्री दिली की ती सुरक्षित आहे. पण ती खूप घाबरलेली होती.
शर्मा यांनी पुढं सांगितले की मुलगी अखेर त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाली. दरम्यान ते पोलिस येण्याची वाट पाहत होते. तसेच "जेव्हा इतर कोणीही तिच्या जवळ यायचे तेव्हा ती माझ्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होती. मग पोलिस आले आणि तिला घेऊन गेले. मुलगी कोणत्या तरी जागेबद्दल सांगत होती. मात्र ते समजण्यास अवघड होतं, असंही शर्मा यांनी म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.