MP: "मामाचा धान्य घोटाळा": मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर विरोधकांचा हल्लाबोल

योजने अंतर्गत वितरीत होणारे रेशन हे फक्त कागदावरच वाटले
Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh Chouhan
Updated on

मध्ये प्रदेशमध्ये महिलाबाल कल्यान विभागा मधून वेगवेगळ्या जिल्हात राहणाऱ्या,3 वर्षाच्या मुलांना, गर्भवती महिलांना, स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आणि शाळेत 11 ते 14 वर्षाखालील मुलांना रेशनचे वाटप केले आहे. टेक होम पूरक पोषण आहारांतर्गत रेशनचे वितरण करत आहे. मध्य प्रदेशच्या महालेखा परीक्षकांच्या लेखापरीक्षण अहवालात ही बाब उघड झाली आहे. या खात्याचे मंत्री सध्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आहे.

दरम्यान विभागाने 2018-21 या काळात सुमारे 2393 करोडचे 4.05 मेट्रिक टन रेशन साधारणपणे 1.35 करोड लाभार्थांना वाटप केले. पण टेक होम रेशनच्या अहवालातून खुलासा झाला आहे की परिवहन, उत्पादन, वितरन, आणि रेशनची गुणवत्ता या सगळ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ह्या योजने अंतर्गत वितरीत होणारे रेशन हे फक्त कागदावरच वाटले आहे.

महालेखा परीक्षकांच्या लेखापरीक्षण अहवालात असे म्हटले आहे की, सुमारे 6.94 कोटी किमतीच्या 6 रेशन उत्पादक कंपन्यांकडून 1125.64 मेट्रिक टन रेशनची वाहतूक करणाऱ्या दुचाकी, कार, रिक्षा आणि टँकरची संख्या दाखवण्यात आली आहे. यासोबतच टेक होम रेशनच्या उत्पादन आणि वितरणाच्या नोंदीमध्येही भ्रष्टाचार समोर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.