मध्य प्रदेशात श्रावणातील शेवटचा दिवस असल्याने या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
काल रक्षाबंधनाचा सण देशभर उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त अनेक मंदिरांमध्येही या उत्सवाचे विशेष आकर्षण दिसून आले. दरम्यान, काल मध्य प्रदेश येथील उज्जैनमध्ये जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात भाविकांनी रक्षाबंधन सण साजरा केला. येथे श्रावणातील शेवटचा दिवस असल्याने बाबा महाकालच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या मंदिरात राखीला आणि रक्षाबंधणाला विशेष महत्व आहे. (ujjain first rakhi to baba mahakal)
पहाटे तीन वाजता आरतीवेळी बाबा महाकाल यांना खास राखी बांधण्यात आली. राखी बांधण्यापूर्वी परंपरेने बाबा महाकालची भस्म आरती करण्यात आली. बाबांना कपाळावर चांदीचा चंद्र अर्पण करण्यात आला. यानंतर मंत्रोच्चाराने गाभाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर पाणी, दूध, दही, मध, तूप आणि फळांच्या रसाने बनवलेल्या पंचद्राव्यापासून बाबांना अभिषेक करण्यात आला.
अभिषेकानंतर भगवान महाकाल यांना भांग, चंदन, सिंदूर आणि अलंकारांनी सजवण्यात आले. बाबा महाकाल यांच्या कपाळावर टिळक आणि डोक्यावरील शेषनागांना चांदीचा मुकुट घालण्यात आला. गळ्यात चांदीची माळ आणि चांदीच्या जडित रुद्राक्षाची जपमाळ वाहण्यात आली. यानंतर यासोबतच सुगंधी फुलांची माळही घातली गेली.
बाबा महाकाल यांच्या श्रृंगारानंतर महानिर्वाणी आखाड्याच्या वतीने भस्म आरती करण्यात आली. यानंतर मूर्तीला नैवेद्य म्हणून फळे आणि मिठाई अर्पण केली गेली. मोठ्या संख्येने भाविकांनी भस्म आरती करून बाबा महाकाल यांचे आशीर्वाद घेतले. रक्षाबंधनाच्या विशेष प्रसंगी बाबा महाकाल यांना १.२५ लाखाहून अधिक लाडू नैवैद्य म्हणून अर्पण केले आहेत. अशाप्रकारे रक्षाबंधनला येथे भाविकांना दर्शन घेत उत्सव साजरा केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.