आरटीआय कार्यकर्त्यानं काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरु केली होती.
विदिशा : मध्य प्रदेशातील (Vidisha Madhya Pradesh) विदिशा जिल्ह्यात गुरुवारी दिवसाढवळ्या एका आरटीआय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आलीय. रणजित सोनी (Ranjeet Soni) असं त्याचं नाव आहे. पीडब्ल्यूडी कार्यालयात हे हत्याकांड घडताच परिसरात एकच खळबळ उडालीय. या घटनेची मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय. पोलिसांनी (Vidisha Police) अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केलीय.
मृत आरटीआय कार्यकर्ते (RTI Activists) रणजित सोनी यांनी काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरु केली होती. याच कारणातून त्यांची हत्या झाली असावी, असं अंदाज बांधला जात आहे. काल सोनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पोहोचले होते. या कार्यालयाजवळच न्यायालय व जिल्हा कार्यालय आहे. त्यामुळं या परिसरात मोठी गर्दी झाली होती. रणजित सोनी हे सायंकाळी पीडब्ल्यूडी कार्यालयातून नुकतेच बाहेर आले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यातच त्यांचा जागीच मृत्यू झालाय.
एसपी मोनिका शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी हा मध्य प्रदेशातील अशोकनगरचा रहिवासी आहे. तो सहा वर्षांपूर्वी पीडब्ल्यूडीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. विदिशाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक समीर यादव म्हणाले, 'रणजीत सोनी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई सुरू केलीय.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.