कुत्रा चावला म्हशीला अन् इंजेक्शन घेण्यासाठी गावकऱ्यांची पळापळ

जेव्हा गावकरी रुग्णालयात पोहचले तेव्हा डॉक्टरांनी इतकी मोठी रांग पाहून इंजेक्शन देण्यास नकार दिला.
a buffalo died due to dog bite
a buffalo died due to dog biteसकाळ डिजिटल टीम
Updated on

मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये दह्याची कोशिबींर खाल्ल्यानंतर 500 लोकांनी अँटी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी दवाखान्यात धाव घेतली. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल मात्र हे सत्य आहे. ही घटना डबरा चांदपुरा गावातील आहे. या गावात एका सामूहिक कार्यक्रमात भोजनमध्ये तब्बल 700 लोकांनी दह्याची कोशिंबीर खाल्ली. मात्र ज्या म्हशीच्या दुधापासून दही आणि त्यानंतर कोशिंबीर करण्यात आली होती, तिचा दोन दिवसांपूर्वी कुत्रा चावल्यामुळे मृत्यू झाला. यानंतर तीच्या बछड्याचाही मृत्यू झाला. हे कळताच भयभीत झालेले गावकरी अँटी रेबिज इंजेक्शन घेण्यासाठी चक्क जिल्हा रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांनी रुग्णालयात प्रचंड केली होती. (There was panic crowd in hospitals As people got know that they consumed food made from the milk of a buffalo who died due to dog bite.)

a buffalo died due to dog bite
लाटांवर तरंगता येणारा पूल पाहिलात का? Video Viral

जेव्हा गावकरी रुग्णालयात पोहचले तेव्हा डॉक्टरांनी इतकी मोठी रांग पाहून इंजेक्शन देण्यास नकार दिला. यावरुन बराच वाद झाला. गावात दहशत पसरली. दूध प्यायल्याने किंवा कोशिंबीर खाल्ल्याने रेबीजसारखा आजार पसरत नसल्याचे डॉक्टरांनीही गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एसडीएम (SDM) यांनी समजावल्यानंतर गावकऱ्यांची भीती कमी झाली.

a buffalo died due to dog bite
वऱ्हाड झोपेत असताना दरीत कोसळली बस; 7 जणांचा मृत्यू, 45 जखमी

चांदपूर गावात एका कार्यक्रमाला जेवणात दह्याची कोशिंबीर करण्यात आली. कार्यक्रमात तब्बल 700 जणं जेवले. तोपर्यंत सर्व ठीक होतं. पण जेव्हा त्यांना कळले की ज्या म्हशीच्या दुधाचे दही आणि कोशिंबीर करण्यात आली होती, तिचा मृत्यू झाला. हे कळताच गावकऱ्यांची चिंता वाढली. दरम्यान यानंतर तीच्या बछड्याचाही मृत्यू झाला. हे कळताच गावकऱ्यांची आणखी धास्ती वाढली. त्यानंतर 500 हून अधिक गावकरी सिव्हील रुग्णालयात अँन्टी रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.