Lotus Of BJP: "कमळ राष्ट्रीय फूल, भाजपला ते वापरण्यापासून रोखा," याचिकेवर हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

BJP Party Symbol: "भाजपला निवडणूक चिन्ह म्हणून कमळ देताना निवडणूक आयोगाने, कमळ हे राष्ट्रीय फूल आहे आणि कर्नाटक व हरियाणाचे राज्य फूल आहे याचा विचार केला नाही."
BJP Election Symbbol Lotus
BJP Election Symbbol LotusEsakal
Updated on

BJP Election Symbol Lotus:

भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह कमळ काढून घेण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर, बुधवार, 20 मार्च 2024 रोजी सुनावणी घेत मद्रास उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

उच्च न्यायालयाने भाजपच्या निवडणूक चिन्ह गोठवावे असे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, असे याचिकेत म्हटले होते.

मुख्य न्यायाधीश एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांचा समावेश असलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तामिळनाडूच्या अहिंसा सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक टी रमेश यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

कमळ हे भारताचे "राष्ट्रीय फूल" आहे, त्यामुळे त्याचे चिन्ह कोणत्याही राजकीय पक्षाला दिले जाऊ शकत नाही आणि त्याचा वापर करू देणे म्हणजे "राष्ट्रीय अखंडतेचा अपमान" आहे, असा दावा तामिळनाडूच्या अहिंसा सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक टी रमेश यांनी आपल्या याचिकेत केला होता.

यावर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर मुख्य न्यायाधीश एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांचा समावेश असलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने टी रमेश यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

टी रमेश यांनी दाखल यांनी दाखल केलेल्या याचिकेत 8 डिसेंबर 2023 रोजी त्यांनी असा युक्तिवाद केला होता की, कमळ हे केवळ धार्मिकच नाही तर राष्ट्रीय चिन्ह देखील आहे. त्यामुळे ते भाजपला देऊन भारतीय निवडणूक आयोगाने स्वतःच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

यावर मुख्य न्यायाधीशांनी रमेश यांना विचारले की, भाजपला दिलेल्या या चिन्हाचा तुम्हाला कसा त्रास होत आहे? यावर रमेश म्हणाले की, इतर पक्षांशी भेदभाव केला जात आहे आणि त्यांच्यावर अन्याय होत आहे.

BJP Election Symbbol Lotus
Election Commissioners Act: निवडणूक आयुक्त कायद्याला स्थगिती देण्यास मोदी सरकारचा विरोध; सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल!

वकील एम.एल. रवी यांच्यामार्फत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात याचिकाकर्ते रमेश यांनी भाजप हा नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष असल्याचे म्हटले होते. त्यांना निवडणूक चिन्ह म्हणून कमळ देताना निवडणूक आयोगाने, कमळ हे राष्ट्रीय फूल आहे आणि कर्नाटक आणि हरियाणाचे राज्य फूल आहे याचा विचार केला नाही.

BJP Election Symbbol Lotus
'नरेंद्र मोदींमध्ये पंतप्रधान बनण्याची क्षमता'; असं म्हणणारे राज ठाकरे पहिले नेते; भाजप नेत्यांच्याही नव्हते गावी?

याचिकाकर्त्याने पुढे म्हटले आहे की, प्राचीन पौराणिक कथांमध्ये कमळाचा उल्लेख असल्याने त्याला शुभ आणि पवित्र मानले जाते. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मात कमळाचे फूल महत्त्वाचे मानले जाते.

हिंदू देवता शिव, विष्णू, ब्रह्मा, गणेश, दुर्गा, काली, लक्ष्मी आणि सरस्वती यांना कमळावर बसलेले दाखवले आहे. हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान विष्णूचे वर्णन पुंडरीकाक्ष म्हणून केले जाते ज्याचा अर्थ 'कमळाचे डोळे' आहे. त्यामुळे राजयकिय पक्षाने याचा वापर करणे अयोग्य आहे असा दावा याचिकाकर्ते रमेश यांनी आपल्या याचिकेत केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.