मद्रास HCचा मोठा निर्णय! पन्नीरसेल्वम यांची याचिका फेटाळली; पलानीस्वामी AIDMK चे प्रमुख

panneerselvams, palaniswami
panneerselvams, palaniswami
Updated on

चेन्नई : उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर ई पलानीस्वामी यांनी मंगळवारी एआयएडीएमकेचे सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारला. त्यामुळे त्यांची आता पक्षावर पूर्ण पकड आहे. मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी पक्षाचे नेते ओ. पनीरसेल्वम आणि त्यांच्या सहाय्यकांच्या AIADMK च्या 11 जुलैच्या महापरिषदेच्या ठरावाविरुद्धच्या याचिका फेटाळून लावल्या. या प्रस्तावांमध्ये त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्याचाही समावेश आहे.

panneerselvams, palaniswami
Jamia Case : उच्च न्यायालयाचा शरजील इमामसह 9 आरोपींना मोठा झटका; कोर्टानं दिला 'हा' आदेश

त्यानंतर लगेचच, AIADMK मुख्यालयातील संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी 68 वर्षीय अंतरिम सरचिटणीस यांची पक्षाच्या सर्वोच्च पदावर एकमताने निवड झाल्याचे घोषित केले. या बढतीबद्दल माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी त्यांच्या समर्थकांचे आभार मानले.

प्रमुख विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी सांगितले की सरचिटणीस बनल्यानंतर पलानीस्वामी पक्षाला चांगले दिवस दाखवतील. न्यायालयाच्या निकालानंतर पलानीस्वामी यांच्या समर्थकांनी येथील AIADMK मुख्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. या निकालाचे स्वागत करत फटाके फोडून मिठाई वाटली.

panneerselvams, palaniswami
Gunaratna Sadavarte : 'डंके की चोट पे' म्हणत नाचणाऱ्या सदावर्तेंची वकिली धोक्यात, सनदच रद्द

निकालानंतर पलानीस्वामी पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी एआयएडीएमकेचे दिवंगत नेते एम जी रामचंद्रन आणि जे. जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.