घटस्फोटीत मुलीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पोटगीवर आईचाही अधिकार; मद्रास कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

घटस्फोटीत मुलीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पोटगीवर आईचाही अधिकार; मद्रास कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
Updated on

नवी दिल्लीः एखाद्या घटस्फोटीत महिलेची आई मुलीच्या पोटगीवर दावा सांगू शकते, तो तिचा अधिकार आहे, असा निर्णय मद्रास उच्च न्यालायाने दिला आहे.

एका प्रकरणामध्ये कोर्टाने हा निकाल दिला आहे. अन्नादुराई नावाच्या व्यक्तीने एक याचिका दाखल केली होती. अन्नादुराई यांचे १९९१ मध्ये सरस्वती नामक महिलेशी लग्न झाले होते. मात्र नंतर त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटीत मुलीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पोटगीवर आईचाही अधिकार; मद्रास कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
Rahul Gandhi : "मी काय खून केला का?" राहुल गांधी हायकोर्टात काय म्हणाले?

२००५ मध्ये अन्नादुराई यांना घटस्फोट मिळाला. त्यानंतर घटस्फोटीत पत्नी सरस्वतीने मदुरांतगम येथील न्यायालायत पोटगीची मागणी केली होती. त्यानुसार कोर्टाने दरमहिन्याला ७ हजार ५०० रुपये देण्याचे अन्नादुराईला आदेश दिले.

मात्र अन्नादुराईने ६. ३७ लाखांची रक्कम थकवली. त्यामुळे २०२१ मध्ये सरस्वतीने थकबाकीची मागणी करणारी याचिका दाखल केली. परंतु, ५ जून २०२१ मध्ये तिचे निधन झाले. त्यानंतर सरस्वतीच्या आईने कोर्टात याचिका दाखल करुन थकबाकीची मागणी केली.

घटस्फोटीत मुलीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पोटगीवर आईचाही अधिकार; मद्रास कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
Wrestler Protest : अरविंद केजरीवालांनी घेतली आंदोलनकर्त्या महिला पैलवानांची भेट, म्हणाले...

सरस्वतीची आई ही तिची कायदेशीर वारस असल्याने कोर्टाने तिच्या बाजूने निर्णय दिला. या आदेशाला आव्हान देत अन्नादुराई यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. सासूला थकबाकीच्या रकमेवर अधिकार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.

मद्रास हायकोर्टाने निकालात म्हटलं की, हिंदू उत्तराधिकारी कायद्याच्या कलम १५ (१) (सी) नुसार आईला तिच्या मुलीच्या मालमत्तेमध्ये हक्क आहे. त्यामुळे थकबाकी रक्कम आणि भविष्यात देखभाल रक्कमेवर अधिकार असेल, असे कोर्टाने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.