इतर धर्मियांना मंदिरप्रवेश नाकारता येणार नाही; मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

madras high court hears case through whatsapp first time in the history
madras high court hears case through whatsapp first time in the history sakal
Updated on

मद्रास - मंदिर प्रवेश करण्यासंदर्भात मद्रास उच्च न्यायलायने (Madras High Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मद्रास हायकोर्टाने आपल्या एका निर्णयात म्हटलं की, जर इतर कोणत्याही धर्मातील व्यक्तीची हिंदू धर्मातील विशिष्ट देवतेवर श्रद्धा असेल आणि ती व्यक्ती त्या मंदिरात जाऊ इच्छित असेल तर त्याला त्या देवाच्या मंदिरात प्रवेश करण्यास प्रतिबंध किंवा बंदी घालता येणार नाही. अशा प्रकारे प्रतिबंध घालण्याची मागणी करणारा जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. (Madras High Court observation regarding temple entry)

madras high court hears case through whatsapp first time in the history
नवरदेवाचा चेहरा पाहताच नवरीने लग्न मंडपातून काढला पळ; म्हणाली फोटोतील...

न्यायमूर्ती पी.एन. प्रकाश आणि न्यायमूर्ती आर. हेमलता यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेवर (पीआयएल) सुनावणी करताना हा निर्णय दिला. तिरुवत्तर येथील अरुलमिघु आदिकेसव पेरुमल तिरुकोविल येथे कुंबाबीशेगम उत्सवात बिगर हिंदूंना सहभागी होण्यास परवानगी देऊ नये, असे निर्देश देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. सी. सोमण नावाच्या व्यक्तीने संबंधीत याचिका दाखल केली होती. कुंबाबीशेगम उत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेत एका मंत्र्याच्या नावाचा उल्लेख आहे. ते मंत्री ख्रिश्चन असून हाच धागा पकडून इतर धर्मियांना प्रवेश प्रतिबंधित करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.

madras high court hears case through whatsapp first time in the history
भाजप हिंदू देवतांचा रक्षक नाही - महुआ मोईत्रा

मद्रास उच्च न्यायालयाने निर्णय देताना महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. न्यायालयाने म्हटलं की, जन्माने ख्रिश्चन असलेल्या डॉ.के.जे. येसुदास यांनी गायलेली भक्तिगीते विविध हिंदू मंदिरांमध्ये वाजवली जातात. नागौर दर्गा आणि वेलंकन्नी चर्चमध्ये कुणाच्याही हस्तक्षेपाशिवाय मोठ्या संख्येने हिंदू भक्त नियमितपणे भेट देतात. शिवाय मोठ्या धार्मिक उत्सवात प्रत्येक व्यक्तीची धार्मिक ओळख तपासणे आणि नंतर त्याला मंदिरात प्रवेश देणे अधिकाऱ्यांना अशक्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दुसर्‍या धर्मातील व्यक्ती विशिष्ट हिंदू देवतेवर विश्वास ठेवत असेल, तर त्याला रोखले जाऊ शकत नाही किंवा मंदिरात प्रवेश करण्यास प्रतिबंध केला जाऊ शकत नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()