Vinod Upadhyay shot Dead : युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर! एक लाखाचे बक्षीस असेला गँगस्टर ठार

यूपीच्या सुलतानपूरमध्ये एसटीएफने माफिया गँगस्टर आणि शार्प शूटर विनोद कुमार उपाध्यायला एन्काऊंटर ठार केले आहे.
Mafia Vinod Upadhyay shot Dead  up stf encounter in sultanpur Latest Marathi news
Mafia Vinod Upadhyay shot Dead up stf encounter in sultanpur Latest Marathi news
Updated on

यूपीच्या सुलतानपूरमध्ये एसटीएफने माफिया गँगस्टर आणि शार्प शूटर विनोद कुमार उपाध्यायला एन्काऊंटर ठार केले आहे. गोरखपूर पोलिसांनी विनोद कुमार उपाध्याय याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

यूपी एसटीएफने केलेल्या कारवाईत तो ठार झाला. यूपीच्या टॉप-61 माफियांच्या यादीत विनोदचे नाव होते. शुक्रवारी पहाटे सुलतानपूर जिल्ह्यात ही चकमक झाली. एसटीएफच्या या पथकाचे नेतृत्व डीएसपी दीपक सिंह करत होते. पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

विनोद उपाध्याय हा मूळचा अयोध्येतील माया बाजार येथील उपाध्याय गावचा रहिवासी होता. जिल्ह्यातील टॉप-10 माफियांमध्येही त्याचे नाव होते. यापूर्वी त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, परंतु नंतर अतिरिक्त पोलिस महासंचालक अखिल कुमार यांनी ते 1 लाख रुपये केले.

Mafia Vinod Upadhyay shot Dead  up stf encounter in sultanpur Latest Marathi news
Mumbai-Goa Highway Traffic : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज वाहतुकीत महत्वाचे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

विनोद उपाध्याय याच्या विरोधात गोरखपूर, बस्ती आणि संत कबीर नगरमध्ये 35 गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यापैकी एकाही प्रकरणात त्याne शिक्षा झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे एसटीएफच्या पथकाने त्याला घेरले असता त्याने पळून जाण्यासाठी गोळीबार सुरू केला. त्याने एसटीएफ टीमवर अनेक राऊंड गोळीबार केला, त्यानंतर एसटीएफने प्रत्युत्तर देत गोळीबार केला. गोळी लागल्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला.

Mafia Vinod Upadhyay shot Dead  up stf encounter in sultanpur Latest Marathi news
सौदी अरेबियाचं नशीब पुन्हा चमकलं! तेलानंतर आता पवित्र मक्का शहरात सापडलं सोन्याचं भांडार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.