नवी दिल्ली : सरकारी शाळांच्या तुलनेत खासगी शाळांत अधिक दर्जेदार शिक्षण दिले जाते, असा समज आहे. छत्तीसगड सरकारने राज्यातील नक्षलप्रभावित आणि आदिवासी भागांतील सरकारी शाळांत दर्जेदार शिक्षण व कौशल्य विकासासाठी पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने सरकारी शाळांत कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी मॅजिक बस फाउंडेशनच्या सहकार्याने तीन वर्षांच्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. राज्यभरातील सुमारे ८०० सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना रोबोटिक तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) धडे दिले जातील.