Mahadev Betting App Case : लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अडचणीत! महादेव बेटिंग ॲप प्रकरणी FIR दाखल

Mahadev Betting App Case : लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
Mahadev App case FIR registered against former Chattisgarh CM Bhupesh Baghel
Mahadev App case FIR registered against former Chattisgarh CM Bhupesh Baghel
Updated on

Mahadev Betting App Case : लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

भूपेश बघेल यांच्या विरोधात पोलीसांनी फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासघात अशा वेगवेगळ्या प्रकरणांशी संबंधीत कलमांतर्गत आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि ११ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. बघेल यांच्या सोबतच एफआयआरमध्ये महादेव बेटिंग ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल यांच्यासह १७ इतर लोकांची नावे देखील आहेत.

महादेव ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरण हे मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने दावा केला होता की त्यांनी एक कॅश कुरियरचे इमेल स्टेटमेंट ट्रॅक केलं आहे. ज्यामध्ये भूपेश बघेल यांनी यूएई येथील या ॲपच्या प्रमोटर्सकडून कथितरित्या ५०८ कोटी रुपये घेतले होते. तसेच महादेव बुकचा मालक सध्या अटकेत असून मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.

Mahadev App case FIR registered against former Chattisgarh CM Bhupesh Baghel
LoKsabha Election 2024: नरेंद्र मोदी, राहुल गांधी... लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचे ठरणारे 10 नेते कोण?

महादेव बेटिंग ॲप हे ऑनलाइन सट्टेबाजीसाठी डिझाइन केलेले ॲप आहे. यावर यूजर्स पोकर, कार्ड गेम्स, चान्स गेम्स नावाचे लाईव्ह गेम्स खेळायेचे. या ॲपच्या माध्यमातून क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल सारख्या खेळांवर यासोबतच निवडणुकांवर अवैध सट्टा लावला जायचा. याचे सर्वाधिक खाते छत्तीसगडमध्ये उघडण्यात आले होते.

Mahadev App case FIR registered against former Chattisgarh CM Bhupesh Baghel
Devendra Fadanvis: मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून अन् दोन साथीदारांना घेऊन- देवेंद्र फडणवीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.