छत्तीसगडची औद्योगिक नगरी भिलाई येथील सौरभ चंद्राकर हा सध्या चर्चेत आहे. सौरभ चंद्राकर याने लग्नात केलेला खर्च ऐकून सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला आहे. चंद्राकरने त्याच्या लग्नात स्टील किंग लक्ष्मी मित्तल आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या तोडीचा खर्च केला. लग्नासाठी त्याने १२० कोटी रुपये देऊन वेडिंग प्लॅनर नेमला होता. इतकेच नाही तर वेडिंग प्लॅनरला ४२ कोटी रुपये रोख दिले होते.
त्याने लग्नात पाहुण्यांना आणण्यासाठी आणि परत सोडण्यासाठी त्यांनी चार्टर विमानाची ही व्यवस्था केली होती. सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार देखील या लग्नाला उपस्थित होते. या लग्नात २०० कोटी रुपये उधळले गेल्याचा अंदाज आहे. मात्र, आता हा सौरभ चंद्राकर ईडीच्या रडारावर आला असून तपास यंत्रणेने आतापर्यंत त्याची ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
मूळचा छत्तीसगडमधील भिलाई येथील सौरभ चंद्राकर आणि त्याचा साथीदार रवी उप्पल महादेव हे या अॅपचे प्रमोटर आहेत. हे दोघे त्यांच्या दुबई मुख्यालयातून पद्धतशीर सट्टेबाजी सिंडिकेट चालवतात. यावर्षी फेब्रुवारीमध्ये चंद्राकरने युएईमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आरएकेमध्ये लग्न केलं. त्यासाठी त्यांनी आपल्या वेडिंग प्लॅनरला १२० कोटी रुपये दिले. नागपुरातील कुटुंबीय आणि या लग्नात परफॉर्म करण्यासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना आणण्यासाठी त्याने खासगी जेट भाड्याने घेतले होते. ईडीने केलेल्या दाव्यानुसार सर्व पैसे हवालाच्या माध्यमातून रोखीने देण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांनुसार योगेश पोपट यांच्या आर-वन इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड च्या मालकीच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हवाला च्या माध्यमातून ११२ कोटी रुपये देण्यात आले होते. रोख रक्कम भरून ४२ कोटी रुपयांचे हॉटेल बुकिंग करण्यात आले होते, अशी माहिती ईडीने दिली आहे.
महादेव अॅप सट्टेबाजी सिंडिकेट विरोधात ईडीने रायपूर, भोपाळ, कोलकाता आणि मुंबईत ३९ ठिकाणी छापेमारी केली. यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या राजकीय सल्लागाराच्या परिसराचाही समावेश आहे. भूपेश बघेल यांच्या राजकीय सहकाऱ्यांवर आरोपींना वाचवण्यासाठी मोठी लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तपास यंत्रणेने १५ जणांना अटक केली आहे.
लग्नात अनेक बड्या सेलिब्रेटींची उपस्थिती
मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर याने आपल्या लग्नात सनी लिओनी, नेहा कक्कड, भारती सिंग, भाग्यश्री, कीर्ती खबांदा, नुसरत भरुचा, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी, आतिफ अस्लम, अली असगर, एली अवराम, टायगर श्रॉफ, कृष्णा अभिषेक आणि पुलकित यांना स्टेज परफॉर्मन्ससाठी आमंत्रित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सौरभने या सर्व सिनेस्टार्सना भरघोस रक्कम दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.