'Mahadev Betting App'च्या मालकाला दुबईत अटक; वर्षभरापासून होता नजरकैदेत

Saurabh Chandrakar: अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीवरून इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Authorities arrest the owner of the Mahadev Betting App Saurabh Chandrakar in Dubai for illegal activities.
Authorities arrest the owner of the Mahadev Betting App Saurabh Chandrakar in Dubai for illegal activities.Interpole apprehending the owner of the Mahadev Betting App in Dubai.
Updated on

Mahadev Betting App owner arrest news in Dubai:

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुख्य आरोपी आणि मुख्य प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला दुबईत अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीवरून इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीच्या कारवाईवरून 2023 मध्ये सौरभ चंद्राकरला पोलिसांनी दुबईतून ताब्यात घेतले होते. तेव्हापासून त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आता जवळपास सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या असून येत्या 10 दिवसांत त्याला भारतात आणले जाईल, असे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. महादेव ॲप प्रकरणात काही नेत्यांची नावेही समोर आली आहेत.

चंद्राकरला गेल्या वर्षी डिसेंबरपासून दुबईत नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ईडीने रायपूर येथील विशेष मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (पीएमएलए) न्यायालयात सादर केलेल्या प्राथमिक आरोपपत्रात चंद्राकर, उप्पल आणि इतर अनेकांची नावे होती.

आरोपपत्रात सौरभ चंद्राकरचे काका दिलीप चंद्राकर यांच्या एका वक्तव्याचा हवाला देण्यात आला आहे, ज्यात म्हटले आहे की, 2019 मध्ये सौरभ दुबईला जाण्यापूर्वी त्याने छत्तीसगडमधील भिलाई येथे 'ज्यूस फॅक्टरी' नावाचे ज्यूसचे दुकान चालवले होते.

Authorities arrest the owner of the Mahadev Betting App Saurabh Chandrakar in Dubai for illegal activities.
Maharashtra Vidhansabha Election: विधानसभेला भाजपसाठी 'RSS'कडून प्लॅन! संघाच्या 6 गोष्टी महायुती सरकारला वाचवणार का?

लग्नावर 200 कोटींचा खर्च

ईडीने आरोप केला आहे की सौरभचे लग्न रास अल खैमाह, यूएई येथे फेब्रुवारी 2023 मध्ये झाले होते आणि यासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

यामध्ये खाजगी जेट भाड्याने घेणे आणि सेलिब्रेटींना भारतातून आणि त्यांच्या नातेवाईकांना विमान प्रवासासाठी पैसे देणे समाविष्ट होते.

या प्रकरणात सुमारे 6,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ईडीचा अंदाज आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की महादेव ऑनलाइन बुक ॲप यूएईमधून ऑपरेट केले जाते.

Authorities arrest the owner of the Mahadev Betting App Saurabh Chandrakar in Dubai for illegal activities.
Cabinet Meeting: मंत्रिमंडळाचे 'हे' निर्णय अजित पवारांना पटले नाहीत? सही न करताच दहा मिनिटांतच कॅबिनेट सोडली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.