नवी दिल्ली - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून या निवडणुकीत भाजप-महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांनी सर्व ताकद पणाला लावावी असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ‘माझा बूथ सर्वांत मजबूत’ या उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘नमो अॅप’च्या माध्यमातून राज्यातील भाजप बूथ प्रमुखांशी थेट संवाद साधला.