Maharashtra Breaking News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi 11 July 2024: देश, विदेश, राज्य आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal
Updated on

Worli Hit And Run Case : बीएमडब्ल्यू चालक राजऋषी बिडावतची न्यायालयीन कोठडीत रवानगी

वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी BMWचा चालक राजऋषी बिडावत याची न्यायालयीन कोठडीत रवानगी. चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर बिडावतची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मिहीर शहा यानं जुहू इथल्या बारमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर त्याच्या चालकानं मालाडवरून बिअरचे चार टिन विकत घेतल्याची पोलिसांची कोर्टात माहिती.

Hingoli Live : इन्स्टावर महिलेचं फेक अकाउंट उघडणाऱ्याला हिंगोली पोलिसांकडून परराज्यातून अटक

हिंगोली मधील महिलेच्या नावाने इंस्टाग्राम वर बनावट अकाउंट तयार करून महिलेची जनमानसात बदनामी करणाऱ्या एका आरोपीला हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरत मधील एका गावातून अटक केली आहे, पीडित महिलेच्या तक्रारीवरून या आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता

शहरी नक्षलवादासाठी राज्य सरकार नवीन कायद्याचं विधेयक विधानसभेत सादर

शहरी नक्षलवादासाठी राज्य सरकारने नवीन कायद्याचं विधेयक विधानसभेत सादर केलं आहे. छत्तीसगढ़, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसाच्या धर्तीवर राज्य सरकार नवीन कायदा आणणार असून शहरात नक्षलवाद फोफावत असल्याने सरकारने हे पाऊल उचलण्यात येत आहे.

सुरक्षित आश्रयस्थळे आणि शहरी अड्डे यात नक्षलवाद फोफावत असल्याने हे विधेयक सादर करण्यात आले. बेकायदेशीर कृत्य आखण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ७ वर्षापर्यंत शिक्षा आणि पाच लाख दंडाची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. बेकायदेशीर संघटनेला मदत केल्यास २ वर्षांची शिक्षा किंवा ३ लाखांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली असून प्रतिज्ञापत्रावरती ही पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे . दरम्यान आगामी विधानसभेसाठी ही तयारी असल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे.

NEET Paper Leak Live : नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला पुन्हा 4 दिवसाची सीबीआय कोठडी 

नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गंगाधर याला आज लातूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते, दरम्यान यावेळी न्यायालयासमोर दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. यावर कोर्टाने नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गंगाधर याला 4 दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या पूर्वी गंगाधर याला न्यायालयाने दोन दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली होती, त्याची मुदत संपल्याने आज त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातील चौथा आरोपी इराण्णा कोंगलवार हा फरार असून त्याच्या तपासात सध्या पोलिसांची पथक रवाना झाली आहेत.

Pooja Khedkar Live : पूजा खेडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गाडीवरचा दिवा ठेवला काढून

वाशिम इथ पूजा खेडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शासकीय गाडीवरील अंबर दिवा काढून ठेवला आहे. आज पूजा खेडकर यांनी वाशिम इथे परिवेक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या शासकीय बोलेरो गाडीवर सकाळी अंबर दिवा होता मात्र नंतर दुपारी तो दिवा काढून ठेवण्यात आला. पूजा खेडकर यांनी स्वतः तो दिवा काढून ठेवायला लावल्याची चर्चा आहे. वादात सापडलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या ऑडी गाडीवर लावलेला अंबर दिवा चांगलाच वादात सापडला होता.

ED Live : माजी मंत्री नागेंद्र यांचे सचिव हरिश यांना अटक

बंगळूर : महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री बी. नागेंद्र यांचे स्वीय सचिव (पीए) हरिश यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी अटक केली.

Madhya Pradesh Live : ट्रक-ऑटोरिक्षाच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये आज भरधाव वेगाने जाणारा ट्रक आणि ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या धडकेत भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. शहरातील ओल्ड कॅन्टोन्मेंट भागात मुरैना हायवेवर हा अपघात झाला.

Gadchiroli Live : गडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण

गडचिरोली : गडचिरोली येथे आज दोन महिला नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या दोघींवर 16 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. प्रमिला सुखराम बोगा उर्फ ​​मंजुबाई (वय ३६) आणि अखिला शंकर पुडो उर्फ ​​रत्नमाला (वय ३४) यांनी गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Indrajit Sawant Live : वाघनख्यांच्या बाबतीत मुनगंटीवार सभागृहात धडधडीत खोटं बोलले - इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत

इतिहासाचा अभ्यास नसलेला सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे. मुनगंटीवार वाघनख्यांच्या बाबतीत सभागृहाच्या पटलावर धडधडीत खोटं बोलले. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा. मुनगंटीवार यांनी कोणतेही पुरावे न देता सभागृहात माहिती दिली आहे. तुमच्याकडे पुरावे नसतील तर नाहीत म्हणून सांगा, पण जनतेची फसवणूक करू नका, असे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.

Vishalgad Case Live : जुलैला शिवभक्त विशाळगडावर जाणारच, संभाजीराजेंचा इशारा

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमाणाविरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विशाळगडावरील अतिक्रमणांबाबत केवळ दिखाऊपणा करणाऱ्या प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, १४ जुलै रोजी शिवभक्त हे विशाळगडावर जाणारच, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. 

National Commission for Scheduled Castes Live : 'एससी-एसटी' निधीबाबत राष्ट्रीय आयोगाची नोटीस

बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारने अनुसूचित जमातीच्या उपयोजनांसाठीचे राखून ठेवलेले १४ हजार कोटी रुपये आपल्या पंचहमी योजनांसाठी वापरल्याबाबत सात दिवसांत सर्वसमावेशक अहवाल सादर करावा, अशी नोटीस राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. इथे क्लिक करा

Vijay Wadettiwar Live : 'सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन थकित वीज बील माफ करावे'

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन त्यांचे थकित वीज बील माफ करावे, अशी मागणी विधासभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

Suresh Devbhakt Passed Away : मुंबईचे रणजीपट्टू सुरेश देवभक्त यांचं निधन

विरार : एकेकाळी मुंबईच्या रणजी टीममध्ये प्रवेशासाठी लाईन लावावी लागत होती, त्या काळात मुंबईपासून ६० मैलांवर असलेल्या विरारमधील आगाशी गावातील एका तरुणाने मात्र आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर अजित वाडेकरांच्या मुंबई संघात स्थान मिळवले. सुरेश देवभक्त हे त्यांचे नाव. दोदू या नावाने मुंबईच्या क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असणारा दोदू हा वसई जिल्ह्यातील मुंबईतर्फे रणजी स्पर्धेत खेळणारा पहिला क्रिकेटपटू त्यांचे आज वृध्दापकाळात निधन झाले ते ८३ वर्षाचे होते. त्यांच्यावर आज दुपारी अंगाशी येथील स्म्शान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. इथे क्लिक करा

BIMSTEC Live Updates : बिमस्टेक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू

बिमस्टेक देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची दुसरी परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली आहे. परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी बिमस्टेक संघटनेच्या सर्व सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांचं केलं स्वागत.

Accident News Live : दगड खाणीत डंपर कोसळला, दोघांचा मृत्यू

वसईमध्ये दगड खाणीत ३५० फूट दरीत डंपर कोसळला आहे. दुर्घटनेत चालक आणि १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. खदानीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे भूस्खलन झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. समद शेख (२३ वर्षे) आणि नरेश पवार (१३ वर्षे ) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Dharashiv Live Updates : धाराशिवमध्ये तृतीयपंथियाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर नाईचाकुर येथील तृतीयपंथीयाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. गावकऱ्यांकडून त्रास होत असल्याने आणि वारंवार पोलीस प्रशासनाला विनंती करूनही कारवाई होत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

NEET Exam Live Updates : नीट संदर्भातली सुनावणी पुढे ढकलली, कारण...

सुप्रीम कोर्टामध्ये नीट संदर्भात होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे. केंद्र आणि NTA ने काल रात्री उत्तर दाखल केले आहे, त्या उत्तराची प्रत काही पक्षांना मिळालेली नाही. त्या पक्षांना ही उत्तरे पाहण्यासाठी आणि उलटतपासणीसाठी तयार होण्यासाठी वेळ हवा आहे. त्यामुळे वकिलांशी चर्चा करून 18 जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतला आहे.

Worli Accident News Live Updates : मिहीर शाहने एका नव्हे तर दोन ठिकाणी केलं मद्यप्राशन

वरळी हिट अँड रन प्रकरणी नवीन माहिती पुढे येत आहे. आरोपी मिहीर शाह याने एका नाही तर दोन ठिकाणी दारू प्यायल्याच तपासात उघड झालं आहे. जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर बोरिवली आणि मालाड दरम्यान एका ठिकाणी दारू प्यायल्याच तपासात उघड झालं आहे.

Maharashtra live update : नवीन पर्यटन धोरणाला आज मिळणार मान्यता?

राज्याच्या नवीन पर्यटन धोरणास आज मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात भरीव गुंतवणूक होण्यासाठी हे नवीन पर्यटन धोरण असेल.

Palghar Live : पालघरमध्ये युरिया खताचा काळा बाजार, 60 पोती जप्त

पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला आहे. डहाणूतील गंजाड मनिपुर येथे काळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला 60 पोती युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कृषी विभागाने जप्त केला आहे.

PM Modi: पंतप्रधान कार्यालयाने मागवला पूजा खेडकर यांचा आहवाल

पंतप्रधान कार्यालयाकडून पूजा खेडकर यांचा अहवाल मागवण्यात आला आहे.पूजा खेडकर यांची वाशिमला प्रोबेशनरी आयएएस म्हणून बदली झालीय.

 Accident News Live: उमरेड नागपूर नॅशनल हायवेवर घाट परिसरात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

उमरेड नागपूर नॅशनल हायवेवर चांपा उपवन क्षेत्रातील VIT कॉलेज चक्री घाट परिसरात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. बिबट्याच्या मृत्यूची माहिती मिळताच घटनास्थळी वन विभागाची टीम पोहचली. उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जंगल परिसर असून रस्त्यांवर ओलांडताना अपघात होतो, आणि अनेकदा काही जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. नॅशनल हायवे असताना कुठलाही वन्य प्राण्यांसाठी अंडरपास नसल्यानं घटना घडत असतात.

PM Modi Austria Visit Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रिया दौऱ्यात व्हिएन्नामध्ये भारतीय समुदायाशी साधला संवाद

''भौगोलिकदृष्ट्या दोन्ही देश दूर असले, तरी दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर साम्य असून लोकशाही दोन्ही देशांना जोडते.'' हा युध्दाचा काळ नाही, भारत ही बुद्धाची भूमी असून भारताचा शांतता आणि भागीदारी यावर दृढ विश्वास असल्याचा दृष्टीकोन पंतप्रधानांनी भारतीय समुदायासमोर मांडला.

Pune Zika Virus Live : पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; एरंडवणे भागात आढळला आणखी एक रूग्ण

पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. एरंडवणे भागात काल आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळेशहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या आता 16 पर्यंत गेली आहे.

Babanrao Tayde Live: तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण मिळालं तर विचार करू- बबनराव तायवाडे

तिसऱ्या आघाडीच्या गतीला सुरुवात झाल्याच ऐकायला येत आहे.. समविचारी पक्ष एकत्र येत आहे. तिसऱ्या आघाडीकडून आम्हाला निमंत्रण मिळालं आणि आमच्या सोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली...तर ओबीसी समाजाचे प्रश्न घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघ संघर्ष करत आहे ते प्रश्न तिसऱ्या आघाडीच्या जाहीर नाम्यात टाकण्याचा आश्वासन मिळालं आणि समाधान झाल. तसेच योग्य त्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं. तर नकीच यावर विचार करू असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तावडे म्हणाले.

Sudhakar Bhalerao Live: भाजपचे माजी आमदार आज शरद पवार गटात प्रवेश करणार

भाजपचे उदगीर मतदार संघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत १०.३० वाजता पक्षप्रवेश होईल.

राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात , सुधाकर भालेराव हे शरदचंद्र पवार पक्षातून अर्थात महाविकास आघाडीतून उदगीर विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.

Mamta Banarjee Live: ममता बॅनर्जी शुक्रवारी घेणार शरद पवारांची भेट

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सिल्वर ओकवर ही भेट होईल. भेटीमागचे कारण समजू शकलेले नाही.

Sheena Bora Case Live : शिना बोराचे सांगाडे अवशेष सापडल्याचा सीबीआयचा दावा

शिना बोराचे सांगाडे अवशेष सापडल्याचा सीबीआयने दावा केला आहे. शिना बोराच्या सांगाड्याचे अवयव सीबीआय कार्यालयातच आहेत. सीबीआयच्या वकिलांनी कोर्टात ही माहिती दिली आहे.

मागच्या सुनावणीत सीबीआयने सांगाड्याचे अवयव सापडत नसल्याचा केला कोर्टात दावा केला होता. मात्र सीबीआयच्या दिल्ली कार्यालयात फॉरेन्सिक विभागात हे सांगाड्याचे अवयव असल्याचं सीबीआयची कोर्टात माहिती दिली.

BJP Meeting Live: भाजपच्या कोअर कमिटीची आज मुंबईत बैठक

भाजपच्या कोअर कमिटीची आज मुंबईत बैठक होणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे राज्य प्रभारी, देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते उपस्थित राहतील

Manoj Jarange Patil Live: मनोज जरांगेंची आज बीडमध्ये शांतता रॅली

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमध्ये शांतता रॅली आहे. यासाठी लाखोंच्या संख्येने समाज जमा होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी जरांगेंच्या रॅलीला परवानगी दिली आहे, सभेला परवानगी दिलेली नाही.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. विधान परिषद सभापतीची निवड केली जाण्याची शक्यता आहे. उद्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये प्रचंड रॅली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com