Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi 23 July 2024: आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत. याशिवाय सध्या राज्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ सुरू असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Marathi News Live Update
Marathi News Live UpdateEsakal
Updated on

kolhapur rain live: पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाने धोक्याची सीमारेषा केली पार, वाहतूक ठप्प होण्याची शक्यता

मिरज कोल्हापूर लोहमार्गावरील पंचगंगा नदी वरील रेल्वे पुलाने धोक्याची सीमारेषा पार केल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता.

वसमतमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार

निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये सामना रंगणार असल्याची शक्यता आहे, आज शरद पवार गटाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांनी ही घोषणा केली, सद्या वसमत विधानसभेत अजित पवार गटाचे आमदार चंद्रकांत नवघरे या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत

NEET UG Liveupdates : नीट प्रकरणाची सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला

NEET UG प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. परीक्षा पुन्हा होणार की नाही? याचं उत्तर कोर्टाच्या निकालानंतर मिळणार आहे.

आंध्र, बिहारला निधी मिळाला त्याचं क्रेडिट देशाच्या जनतेला जातं- सुळे

खुर्ची वाचवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही किती गोष्टी करणार? आंध्र आणि बिहारला निधी मिळाला त्याचं क्रेडिट देशाच्या जनतेला जातं, असा घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

आधी ते मोदी सरकार होतं आता ते NDA सरकार झाल आहे, महाराष्ट्राने असं काय केलं की त्यांच्या मित्रपक्षांना काकाही दिलं नाही.. असं म्हणत सुळेंनी राज्यासह केंद्र सरकारवर टीकास्र सोडलं.

Supriya Sule Live : काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील मुद्दे बजेटमध्ये- सुप्रिया सुळे

काँग्रेसच्या जाहिरनाम्यामधील अनेक मुद्दे बजेटमध्ये दिसून आल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. केंद्राने महाराष्ट्रासाठी काहीच दिसं नसून टॅक्समध्येही दिलासा दिला नसल्याचं त्या म्हणाल्या.

आशा स्वयंसेविकांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

राज्यातील आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अशा स्वयंसेविकांना सानुग्रह अनुदनाच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून आॅन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाला तर तात्काळ दहा लाखांची मदत तर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर पाच लाखांची मदत राज्य सरकार करणार आहे. ५ एप्रिल 2024 पासून ही योजना लागू असेल. राज्यात एकुण ७५हजार ५६८ आशा स्वयंसेवीका कार्यरत आहेत.

Prakash Shendge Live : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला बळी पडून सरकारने वेगळा निर्णय घेतला तर सर्व आमदार पडायची ताकद ओबीसींच्यात आहे. आम्ही सरकारचे आमदार पाडूच पण आमचे आमदारही निवडून आणू आणि सत्ताही स्थापन करू. तसेच ओबीसी आरक्षणासाठी आता रस्त्यावरची लढाई करू, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी सरकारला दिला आहे.

Shiv Sena Live : पनवेलमध्ये भाजपला खिंडार, ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

मंगळवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पनवेलमधील भाजपाचे उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Nashik Live : नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव शरद पवारांच्या व्यासपीठावर

नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव शरद पवार यांच्या व्यासपीठावर दिसले. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा आज निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीतून उमेदवारीसाठी ते इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली.

Varsha Gaikwad Live Updates : बजेटमध्ये दुर्दैवाने महाराष्ट्राचे नाव घेण्यात आले नाही - वर्षा गायकवाड

उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे मोठ राज्य आहे. आम्हाला अपेक्षा होती की राज्याला काहीतरी विशेष मिळेल पण दुर्देवाने बजेटमध्ये महाराष्ट्राचे नाव घेतले गेले नाही.

Balwant Wankhede Live Update :  महाराष्ट्राला बजेटमधे भोपळा मिळाला - बळवंत वानखेडे

अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रप्रदेश या राज्यांना मोठे पॅकेज देण्यात आले. परंतु, महाराष्ट्राला या बजेटमध्ये भोपळा मिळाला असून, कॉंग्रेसच्या खासदारांनी याचा निषेध केला आहे, असे विधान कॉंग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी केले आहे.

Dimple Yadav Live Update : महिलांच्या सुरक्षेबद्दल अर्थसंकल्पात काहीच तरतूद नाही - डिंपल यादव

महिलांच्या सुरक्षेबद्दल अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही, असे वक्तव्य उत्तरप्रदेशच्या मैनपुरीच्या समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव यांनी केले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत, स्वयंपाकघराबाबत काळजी घेतली गेली नाही. महागाईबाबत काहीच घोषणा नसल्याचे मत त्यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केले.

NEET Exam Live: NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात

NEET UG पेपरच्या प्रश्न क्रमांक 9 बाबत IIT दिल्लीच्या तज्ज्ञांचा अहवाल आम्हाला मिळाला आहे. IIT चे संचालक प्रो. बॅनर्जी यांनी भौतिकशास्त्र विभागाकडून एक समिती स्थापन केली होती. तीन तज्ज्ञांच्या पथकाने या प्रश्नाचे परीक्षण केलं. पर्याय 4 हे योग्य उत्तर असल्याचं समितीने सांगितलं, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.

Lakshman Hake Live: शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत- लक्ष्मण हाके

शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत, असा आरोप ओबीसी आंदोलक प्रा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. बीडच्या चकलंबा गावात ओबीसी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.

BJP-RSS Meeting Live: संघ आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपची मुंबईत बैठक

संघ आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपची थोड्याच वेळात मुंबईत बैठक होणार आहे. संघ परिवार आणि भाजपतील संवादासाठी समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपातील संघटन मंत्री, निर्णय प्रक्रियेतील मोजके महत्त्वाचे नेते आणि संघ परिवारातील निवडक ज्येष्ठ पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत.

लोकसभेतील पिछेहाट, संघ आणि भाजपत उडालेले खटके, जे पी नड्डा यांच्या विधानानंतर दोहोंमध्ये आलेली कटुता, विधानसभेच्या दृष्टीने करावी लागणारी तयारी व इतर विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री गिरीश महाजन, आमदार आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत

Kolhapur Panchganga River Live: पंचगंगा नदीची पातळी धोकादायक होण्याच्या दिशेने

कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पातळी धोकादायक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झालेली असल्याने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update Live: राज्यातील १३ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

राज्यातील १३ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. मुंबईमध्ये तूर्तास पावसाने उसंत दिल्याचं पाहायला मिळतंय. रत्नागिरी सिंधुदूर्गला रेड अलर्ट देण्यात आलाय.

MNS Live: विधानसभा निवडणुकीत मनसे लढणार 200 हून अधिक जागा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे 200 ते 225 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असून पक्षाचे कार्यकर्ते त्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे प्रकाश महाजन यांनी सांगितले.

महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Canada Live: कॅनडामध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिराची तोडफोड

कॅनडामधील हिंदू प्रार्थनास्थळांवर सतत हल्ले होत असल्याने वातावरण बिघडले आहे, अशात आता एडमंटनमधील BAPS स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे.

Maharashtra Rain Live: पुराची भीती; राज्यातील विविध भगांत एनडीआरएफच्या तुकड्या तैनात

मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्येही मंगळवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज आयएमडीने वर्तवला असून बुधवारपर्यंत “अत्यंत जोरदार पाऊस” होईल असे म्हटले आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील विविध भगांत एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत

Jammu And Kashmir Live: पाकिस्तानातून काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, एक जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या बटाल सेक्टरमध्ये पाकिस्तानचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आहे. या कारवाईत एक जवान गंभीर जखमी झाला. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. परिसरात दाट धुक्यामुळे दृश्यमानता शून्य आहे. अशा स्थितीत शोध मोहिमेत अडचण येत आहे.

जम्मू भागात अलीकडे दहशतवादी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, भारतीय लष्कराचे जवान सातत्याने कारवाई करत आहेत. याच क्रमाने आज पुन्हा एकदा लष्कराच्या जवानांनी बटाल भागात कारवाई केली.

Supreme Court Live: राष्ट्रवादी, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावनी

राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावनी होणार आहे.

Maharashtra Breaking News Live Updates: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत. राज्यात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासह शाळा, महाविद्यालयांना सुट्टी तर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून, युती आणि आघाड्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चांना जोर आला आहे.

दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com